शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
2
१९८३ चा क्षण महिला संघाने जिवंत केला! सचिन तेंडुलकरकडून टीम इंडियाचे कौतुक करत 'प्रेरणादायी' पोस्ट
3
आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
4
आता रिक्षा, टॅक्सी, बससाठी लागेल स्वतंत्र पार्किंग; राज्य परिवहन विभागाचे नवे धोरण
5
विशेष लेख: दुबार मतदार, मतचोरी आरोपावर भाजप नेते बोलतात, निवडणूक आयोग का बोलत नाही..?
6
'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
7
मंत्री बंगल्यावरील कामात कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर माेहाेर; चौकशीत अभियंते दोषी
8
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
9
‘परिवहन’ची मंजुरी इलेक्ट्रिकला अन् सुसाट धावतात पेट्रोल बाइक टॅक्सी; कारवाईला ठेंगा
10
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
11
महापौर आमचाच होऊ दे; उद्धव ठाकरे यांचे महोत्सवात देवाला गाऱ्हाणे; कार्यकर्त्यांना सल्ला
12
पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेले नागरिक आणि ‘कलिंगड’ आइस्क्रीम!
13
कोस्टल रोड वाहतुकीसाठी २४ तास खुला; पण अंधारातून प्रवास असल्याने अपघाताचा धोका वाढला !
14
बांगलादेशींच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी; पालिका निवडणुकीमुळे वातावरण तप्त
15
विशेष लेख: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही, तर आम्ही थांबणार नाही; हा एल्गार थांबणार नाही..!!
16
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
17
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
18
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
19
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
20
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!

जीवनदायिनी वर्धा नदीच्या पात्राला डबक्याचे स्वरूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 22:02 IST

चंद्रपूर-यवतमाळ जिल्ह्याच्या सिमेवरून वाहणाºया जिवनदायीनी वर्धा नदीचा नैसर्गीक प्रवाह बंद झाल्याने गेल्या काही दिवसांपासून या नदीला डबक्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. परिणामी या नदीकाठावरील गावांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.

ठळक मुद्देसंडे अँकर । भीषण पाणीटंचाई, नदीकाठच्या गावांना बसतोय फटका, मातीच्या ढिगाऱ्याने पात्र बुजले

म.आसिफ शेख ।लोकमत न्यूज नेटवर्कवणी : चंद्रपूर-यवतमाळ जिल्ह्याच्या सिमेवरून वाहणाºया जिवनदायीनी वर्धा नदीचा नैसर्गीक प्रवाह बंद झाल्याने गेल्या काही दिवसांपासून या नदीला डबक्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. परिणामी या नदीकाठावरील गावांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.गंभीर बाब ही की, वर्धा नदीला लागून असलेल्या कोलार पिंपरी, तेलवासा, जुनाड या वेकोलिच्या खाणीतील मातीचे मोठमोठे ढिगारे अगदी नदीकाठावर टाकण्यात आल्याने वर्धा नदीचे संपूर्ण पात्रच बुजले आहे. परिणामी नदीचा प्रवाहदेखील बदलला आहे. याच कारणाने ही नदी कोरडी पडल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या नदीवरून सावर्ला, नायगाव, कोलार, जुनाड, पिंपळगाव, उकणी व वेकोलिच्या वसाहत असलेल्या प्रगतीनगर, भालर कॉलनी येथे पाणी पुरवठा होतो. परंतु वर्धा नदी कोरडी पडल्याने या गावांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. जुनाड व तेलवासा या खाणीतील मातीचे ढिगारे नदीच्या दोन्ही बाजूला अगदी लागून टाकण्यात आले आहे. परिणामी नदीपात्रातील पाण्याचा प्रवाह समोर येण्यास अनेक अडचणी निर्माण होत आहे.सातत्याने वाहणारा नदीचा प्रवाह बंद झाल्याने भालर कॉलरी व प्रगतीनगर कॉलनीमधील नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. जुनाड घाटावरील जॅकवेलपर्यंत पाणी पोहोचत नसल्याने पीसी मशीनद्वारे नाली खोदून नदीचे पाणी कॉलनीकडे नेण्यात येत आहे. वेकोलिच्या कोलार, जुनाड, चारगाव व नदीव जुनाड, या चार कोळसा खाणीतील ओव्हरबर्डनमुळे वर्धा नदीचे पात्र दिवसेंदिवस बुजत चालले आहे. वर्धा नदीच्या पात्रात अनेक ठिकाणी मोठमोठे दगड जमा झाले असल्याचे दिसून येत आहे.खाणीच्या पाण्यामुळे धोकावेकोलिच्या कोलार, जुनाड, उकणी, चारगाव, कुनाडा, माजरी या कोळसा खाणींचे पाणी थेट वर्धा नदीत जात असल्याने पर्यावरणाला मोठा धोका निर्माण झाला आहे. गंधक, लोह, क्षार, कार्बन, शिसे, आदी घटक पाण्याद्वारे नदीपात्रात जात आहे. सध्या नदीपात्रात पाण्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे हे पाणी आरोग्यासाठी धोकादायक मानले जात आहे. नियमानुसार उद्योगातील रसायनयुक्त पाणी थेट नदीमध्ये सोडत येत नाही. हा कायदेशीर गुन्हा ठरतो. परंतु कायद्याला न जुमानता रसायनयुक्त पाणी थेट नदीत सोडले जात असले तरी प्रदूषण विभाग मात्र वेकोलि किंवा अन्य उद्योगांच्या विरोधात कोणतीही कारवाई करताना दिसत नाही.रांगणा-भुरकीने तारलेवणी शहराला वर्धा नदीवरून पाणी पुरवठा होत असून रांगणा डोहातील पाणी ओढून ते ११ किलोमीटर अंतरावर असलेल्या वणी शहराला पुरविले जात आहे. विशेष म्हणजे रांगणा-भुरकी डोहात बारमाही पाणी असते. या डोहाचे पाणी कधीच आटले नाही. वणी नगरपरिषदेमार्फत या डोहावर कोट्यवधी रूपये खर्च करून पाणी पुरवठा योजना सुरू केल्याने यंदाचा उन्हाळा वणीकरांसाठी टँकरमुक्त ठरला असून त्यामुळे वणीकर जनतेमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

टॅग्स :Wardha Riverवर्धा नदी