शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

बघा नातवांनो, आजीची कमाल, साठीच्या वयात प्रौढ असाक्षरांसाठीच्या परीक्षेत ९८ टक्के गुण!

By अविनाश साबापुरे | Updated: May 27, 2024 13:03 IST

शेतात राबत जिल्ह्यात अव्वल क्रमांक पटकावलेल्या दोन आजींची यशोगाथा

अविनाश साबापुरे, लोकमत न्यूज नेटवर्क, यवतमाळ: वावरात काबाडकष्ट उपसत म्हातारपण आलेल्या आजींनी यंदा परीक्षा दिली अन् चक्क ९८ टक्के गुण मिळवत जिल्ह्यात अव्वल नंबरही पटकावला ! हातात कधीही पाटीपुस्तक न धरलेल्या, कधीही शाळेत न गेलेल्या पण आता उतारवयात शिक्षणाची संधी मिळताच संधीचे सोने करणाऱ्या या आजी एकट्याच नाहीत बरं का! त्या आहेत दोघी. एकीचे नाव आहे मीरा मोतीराम पेंदोर. तिचे वय आहे ५५ वर्षे. अन् दुसरीचे नाव आहे सुशीला पुंजाराम ढोक. तिचे वय आहे ६५ वर्षे.

प्रौढ असाक्षरांसाठी झालेल्या परीक्षेतील ‘टाॅप’ वयोवृद्ध विद्यार्थ्यांची ही यशोगाथा आहे. प्रौढ असाक्षरांना शिकवून १७ मार्च रोजी त्यांची १५० गुणांची परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल नुकताच राष्ट्रीय मुक्त विद्यालय मंडळातर्फे जाहीर करण्यात आला आहे.  त्यामध्ये मीरा पेंदोर आणि सुशीला ढोक या दोन आजीबाईंनी चक्क ९८ टक्के गुणांची कमाई करत इतर ज्येष्ठ महिलांपुढे आदर्श ठेवला आहे.

कोण आहेत या आजीबाई?

सुशीला ढोक या आजी बाभूळगाव तालुक्यातील घारफळ गावच्या. तेथील जिल्हा परिषद शाळेच्या केंद्रावरून त्यांनी परीक्षा दिली. वृद्ध पती, दोन मुले, एक मुलगी, नातू अशा गोतावळ्यात त्या रमलेल्या. घरच्या चार एकर वावरात याही वयात त्या राबतात. तर मीरा पेंदोर या आजी यवतमाळ तालुक्यातील अकोलाबाजार गावच्या. परिस्थिती बेताचीच. आयुष्यभर शिकण्याची संधीच मिळाली नाही. संधी येताच अकोलाबाजारच्या केके स्प्रिंगडेल शाळेच्या केंद्रावरून त्यांनी पेपर दिला.

पटकावले पैकीच्या पैकी गुण!

१५० गुणांच्या परीक्षेत ५०-५० गुणांचे तीन पेपर होते. त्यात सुशीला ढोक यांनी १४६ गुण मिळविले. वाचन-लेखन पेपरमध्ये ५० पैकी ५० गुण मिळविले. मीरा पेंदोर यांनीही १४७ गुणांची कमाई केली.

टॅग्स :Yavatmalयवतमाळ