शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO : "ए मंत्रीजी जोर से ताली बजा दो...!"; व्यासपीठावर जेपी नड्डा यांच्यासमोर वेगळ्याच अंदाजात दिसल्या वसुंधरा राजे 
2
पाकिस्तानने युद्धविरामाची विनवणी केली; भारतीय शिष्टमंडळाने सांगितला 'त्या' दिवसाचा घटनाक्रम
3
शेतीच्या वादातून जन्मदात्या आईचा खून; मुलासह सून, व्याही पोलिसांच्या जाळ्यात अडकले
4
काही गोष्टी मनात ठेवायच्या...'त्या' वादग्रस्त विधानावर अजित पवारांनी कोकाटेंचे कान टोचले
5
पाण्याच्या टाकीवर चढून बैलाने घातला शोलेस्टाईल धिंगाणा, सहा तासांनंतर झाली सुटका
6
भारताच्या स्वातंत्र्यानंतर ६५९ दिवसांनी भोपाळमध्ये फडकला तिरंगा; १ जूनचा इतिहास जाणून घ्या
7
तो कोणाच्या संपर्कात होता, काय चॅटिंग केले ? नीलेश चव्हाणकडे सापडले नेपाळचे सीमकार्ड 
8
"२०२६ मध्ये ममता बॅनर्जी सरकार कायमचं उखडून टाकू..."; अमित शाह यांनी दिलं चॅलेंज
9
विद्यार्थी आंदोलन चिरडण्यासाठी स्वत:च देत होत्या चिथावणी, बांगलादेशच्या कोर्टात शेख हसिनांवर गंभीर आरोप
10
आठवा वेतन आयोग लागू होण्यास होऊ शकतो उशीर, जानेवारी 2026 पासून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचं काय होणार? आली नवी अपडेट
11
...तर पाकिस्तानसोबतच चीनचीही हवा निघणार! रशियानं भारताला दिली Su-57E ची जबरदस्त ऑफर, काय आहे याची 'खासियत'?
12
Coronavirus: हळूहळू पाय पसरतोय कोरोना! देशात सक्रीय रुग्णसंख्या ३७५८; राज्याची आकडेवारी वाचा
13
CNG-PNG वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! नैसर्गिक वायूच्या दरात मोठी कपात, 'इतके' रुपये वाचणार!
14
सिद्धार्थच्या आईचा नवा व्यवसाय, सीमा चांदेकर यांनी पुण्यात सुरू केलं स्वत:चं दुकान
15
अजितदादा-महेशदादा यांच्यातील खडाखडीमुळे महापालिका निवडणुकीत रंगणार दोस्तीत कुस्ती
16
धक्कादायक! कापायची होती पट्टी, फोनवर बोलण्याच्या नादात नर्सने कापले बाळाचे बोट
17
मुंबई आणि पंजाबमधील लढत पावसामुळे रद्द झाल्यास फायनलमध्ये कोण जाणार? असं आहे समीकरण
18
आता वेळ नाही, भारतात आल्यावर योग्य उत्तर देईन; शशी थरुर यांचा काँग्रेसला घरचा आहेर

‘पीआरसी’साठी लगबग

By admin | Updated: June 30, 2016 02:30 IST

पंचायत राज समिती (पीआरसी) आॅगस्ट महिन्यात यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे.

कळंब पंचायत समिती : आॅगस्टपर्यंत माहिती अपडेट करणे सुरूकळंब : पंचायत राज समिती (पीआरसी) आॅगस्ट महिन्यात यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. त्यामुळे आतापासूनच स्थानिक पंचायत समितीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची माहिती अपडेट करण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. अनेक आमदारांचा समावेश असलेल्या या समितीमधील काही सदस्यांची कळंब पंचायत समितीला भेट ठरलेलीच असते. आता राज्यात भाजप-सेनेची सत्ता आहे. १९९५ नंतर पहिल्यांदाच भाजपा-सेनेच्या कार्यकाळात ही पंचायत राज समिती येत आहे. याची काही कर्मचाऱ्यांनी आतापासूनच धास्ती घेतली आहे. तालुक्यातील कुठल्याही कर्मचाऱ्यावर कारवाई होऊ नये, यासाठी सर्व ठिकठाक करण्याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. समितीकडून लेखा आक्षेप, शाळा, अंगणवाडी, बांधकाम, आरोग्य, समाजकल्याण, कृषी, सामान्य प्रशासन, शिक्षण, ग्रामपंचायत, शालेय पोषण आहार आदी बाबींची तपासणी केली जाते. लेखा परीक्षण अहवालातील त्रुटी अनुपालन तपासणी हे या समितीचे मुख्य लक्ष्य असते. त्यामुळे सर्व बाबी व्यवस्थित करून ठेवण्यावर भर दिला जात आहे. समितीला सामोरे जाण्यासाठी कुठल्याही उणिवा राहणार नाही, याची दक्षता अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून घेतली जात आहे. (तालुका प्रतिनिधी)