शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

Lok Sabha Election 2019; सर्वदूर उत्सव पण आजंती शांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 22:28 IST

मागील ४० वर्षांपासून पाणीटंचाईच्या झळा सोसत असलेल्या नेर तालुक्यातील आजंती येथील मतदारांनी गुरुवारी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकून आपला संताप व्यक्त केला. एक हजार १८९९ पैकी १७० लोकांनी मतदान केले.

ठळक मुद्देमतदानावर बहिष्कार : पाणी प्रश्नाने त्रस्त नागरिकांचा रोष, प्रशासनाने निवेदन अडगळीत टाकले

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : मागील ४० वर्षांपासून पाणीटंचाईच्या झळा सोसत असलेल्या नेर तालुक्यातील आजंती येथील मतदारांनी गुरुवारी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकून आपला संताप व्यक्त केला. एक हजार १८९९ पैकी १७० लोकांनी मतदान केले. दिवसभर पाण्याच्या शोधात बाहेर पडणारे महिलांचे पाय आज मात्र मतदानाच्यावेळी घरातच अडखळून पडले. या गावातील मतदान केंद्रावर सन्नाटा होता.गावातील पाणीटंचाई दूर व्हावी यासाठी राबविण्यात आलेल्या विविध योजना तकलादू ठरल्या. दरवर्षी जानेवारी महिन्यातच गावातील जलस्रोत आटायला सुरू होते. एप्रिल आणि मे महिन्यात तर महिलांना रात्रंदिवस पाण्याचाच वेध असतो. बैलबंडीने दूर शेतातून पाणी आणावे लागते. पाणीटंचाईमुळे गावात विवाह समारंभ होत नाही. शहरातील खर्चिक अशा मंगल कार्यालयात जाऊन कार्यप्रसंग पार पाडावे लागतात.गतवर्षी गावातील महिलांनी मोर्चा काढून प्रशासनाला निवेदन दिले होते. यावर कुठलेही सकारात्मक पाऊल उचललेले नाही. गावकऱ्यांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्काराचा निर्णय घेतला. सर्वांनीच याला समर्थन दिले. याविषयीचे निवेदन तहसील विभागाला देण्यात आले होते. याची दखल घेण्यात आली नाही. अखेर हा इशारा प्रत्यक्षात उतरविण्यात आला. या गावातील मतदान केंद्राच्या रस्त्यावर सकाळपासूनच शुकशुकाट होता. परिणामी तालुक्यात अल्प मतदानाची टक्केवारी आजंती येथील मतदान केंद्रावर पाहायला मिळाली. मात्र गावातील दुसºया गटाने मतदान करून या बहिष्काराला खो दिल्याचे चित्र पाहायला मिळाले.नागरिकांनी नोंदविल्या तीव्र भावनामतदानावर बहिष्कार टाकताना या गावातील नागरिकांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. सुनीता श्रृंगारे यांच्या पतीचे गतवर्षी अपघाती निधन झाले. पाणी समस्या मांडण्यासाठी ते गेले होते. परतत असताना रेती तस्करीच्या ट्रकने त्यांचा जीव घेतला. त्यांनी प्रशासनाविषयी आपला रोष व्यक्त केला. कुसूमताई साबळे, राखी नीलेश जुनघरे, सतीश अरसोड, रमेश गायकवाड, नेर बाजार समितीचे उपसभापती दिवाकर राठोड, रेखा विजयकार आदी नागरिकांनी आपल्या भावना ‘लोकमत’कडे व्यक्त केल्या. प्रत्येक वर्षी पाण्यासाठी हाल सहन करावे लागत असेल तर मतदान कशाला करायचे, असा प्रश्न या गावातील लोकांनी मांडला आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकyavatmal-washim-pcयवतमाळ-वाशिमMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019