शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019; खर्च सादर न करणाऱ्या सात अपक्षांना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 13:16 IST

लोकसभा निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवाराला ७० लाख रूपयांच्या खर्चाची मर्यादा आहे. उमेदवाराने किती खर्च केला, याचा हिशेब दररोज सादर करण्याचे बंधन आहे. मात्र यवतमाळ-वाशिम मतदार संघातील सात अपक्षांनी निवडणूक विभागाकडे खर्चाचा हिशेब सादर केला नाही.

ठळक मुद्देदस्तावेजाची क्रॉस चेकींग : ४८ तासांच्या आत उत्तर सादर करण्याचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : लोकसभा निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवाराला ७० लाख रूपयांच्या खर्चाची मर्यादा आहे. उमेदवाराने किती खर्च केला, याचा हिशेब दररोज सादर करण्याचे बंधन आहे. मात्र यवतमाळ-वाशिम मतदार संघातील सात अपक्षांनी निवडणूक विभागाकडे खर्चाचा हिशेब सादर केला नाही. त्यांना नोटीस बजावण्यात आली असून ४८ तासांत हिशेब सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहे.यवतमाळ-वाशिम मतदार संघात २४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. या सर्व उमेदवारांना २, ५ आणि ९ एप्रिल रोजी केंद्रीय खर्च निरीक्षकांसमोर (आॅबझर्व्हर) संपूर्ण खर्च अहवाल सादर करण्याचे आदेश निवडणूक विभागाने दिले. तसेच दररोजच्या खर्चाचा हिशेबही त्यांना सादर करावा लागेल. मंगळवारी निवडणूक विभागाचे खर्च निरीक्षक विक्रम पगारिया यांच्या अध्यक्षतेखाली खर्चाचा आढावा घेण्यात आला. यावेळी सर्व २४ उमेदवारांनी खर्च सादर करणे आवश्यक होते. मात्र १७ उमेदवारांनीच खर्चाचा हिशेब सादर केला.केंद्रीय खर्च निरीक्षकांसमोर सात उमेदवारांनी खर्चाचा हिशेबच सादर केला नाही. हे सातही उमेदवार अपक्ष आहेत. त्यांना ४८ तासांत हिशेब सादर करण्यासाठी निवडणूक विभागाने नोटीस बजावली. यानंतरही त्यांनी खर्चाचा हिशेब न सादर केल्यास त्यांच्याविरूद्ध गुन्हे नोंदविले जाईल, असे निवडणूक विभागाने स्पष्ट केले.निवडणुकीच्या रिंगणात अपक्षांची संख्या जादा आहे. त्यात सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या उमदेवारापेक्षाही या अपक्षांनीच सर्वाधिक खर्च केल्याची बाब समोर आली.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकyavatmal-washim-pcयवतमाळ-वाशिमMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019