शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019; चंद्रपूरचा खासदार दारूवाला हवा की दूधवाला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 21:39 IST

चंद्रपूरचा नवा खासदार दारूवाला हवा की दूधवाला, असा प्रश्न सोशल मीडियावर चर्चिला जात आहे. या माध्यमातून विरोधकांच्या हाती आयतेच कोलीत मिळाले आहे. विरोधक काँग्रेस आघाडीचे उमेदवार बाळू धानोरकर यांच्यापुढे अडचणी वाढवित आहेत.

ठळक मुद्देसोशल मीडियावर चर्चा : धानोरकरांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : चंद्रपूरचा नवा खासदार दारूवाला हवा की दूधवाला, असा प्रश्न सोशल मीडियावर चर्चिला जात आहे. या माध्यमातून विरोधकांच्या हाती आयतेच कोलीत मिळाले आहे. विरोधक काँग्रेस आघाडीचे उमेदवार बाळू धानोरकर यांच्यापुढे अडचणी वाढवित आहेत. त्याचा फटका धानोरकरांना लोकसभा निवडणुकीत चांगलाच बसण्याची शक्यता आहे.पक्षनिष्ठा बासनात गुंडाळून शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करणाऱ्या बाळू धानोरकरांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला खरा; परंतु त्यांचा काँग्रेस प्रवेश त्यांना अडचणीत तर आणणार नाही ना, अशी भीती राजकीय विश्लेषकांमध्ये व्यक्त केली जात आहे. विविध मुद्दे पुढे करून धानोरकरांची कोंडी करण्याचा प्रयत्न सध्या सोशल मीडियावर सुरू आहे. विद्यमान खासदार व भाजपाचे उमेदवार हंसराज अहीर यांचा मूळ व्यवसाय दूध विक्रीचा आहे, तर काँग्रेसचे बाळू धानोरकर यांचा दारू विक्रीचा व्यवसाय आहे. वणी परिसरात त्यांचे दारूचे दुकानदेखील आहे. त्यामुळे विरोधकांना आयताच मुद्दा मिळाला आहे. अहीर आणि धानोरकर यांचा फोटो एकत्र करून त्यावर खासदार दूधवाला हवा की दारूवाला? असा सवाल उपस्थित करीत तो फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे. त्यामुळे धानोरकरांची चांगलीच पंचाईत झाली आहे. भाजपाच्या प्रचार सभांमधूनही धानोरकर यांच्या दारू व्यवसायावर मोठे नेते सडकून टीका करताना दिसत आहेत. त्यामुळे प्रचार सभांमध्ये चांगलीच रंगत येत आहे. महिलांचा दारूला प्रचंड विरोध आहे. त्यामुळे भाजपाकडून दारूचा मुद्दा पुढे करून महिला मतांना ‘कॅश’ करण्याचा प्रयत्न सुरू आहे. दुसरीकडे धानोरकरांनी दाखल केलेल्या नामांकन अर्जात पाच गुन्हे नमूद असून त्यामध्ये तब्बल १३ कलमांचा समावेश आहे. धाकदपटशाही, कायद्याचे उल्लंघन, या सारख्या गुन्ह्यांची त्यांच्यावर नोंद आहे. तर प्रतिस्पर्धी उमेदवारावर एकही गुन्हा दाखल नाही.वणीतील दारू दुकान बंद ठेवण्याची खबरदारीविरोधकांकडून सातत्याने ‘दारू’चा मुद्दा पुढे करून नकारात्मक प्रचार केला जात असल्याने कॉंग्रेसच्या गोटात अस्वस्थता आहे. अपप्रचार वाढू नये म्हणून बाळू धानोरकर यांनी वणीतील दारू दुकान काही दिवसांपासून बंद ठेवण्याची काळजी घेतली आहे. सध्या या दुकानाला टाळे लावण्यात आले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकHansraj Ahirहंसराज अहिर