शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019; देश सुरक्षित हवा असेल तर युतीला मतदान करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 21:54 IST

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ/वणी : आम्ही राष्ट्रप्रेमाखातर भाजपशी असलेले मतभेद गाडून टाकलेत. भाजप आणि शिवसेना हे दोन पक्ष एका ...

ठळक मुद्देउद्धव ठाकरे : यवतमाळ, वणीत जाहीर सभा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ/वणी : आम्ही राष्ट्रप्रेमाखातर भाजपशी असलेले मतभेद गाडून टाकलेत. भाजप आणि शिवसेना हे दोन पक्ष एका विचाराचे आहेत. देशाची सुरक्षा हवी असेल तर शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवारालाच मतदान करा, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.सोमवारी दुपारी वणी आणि सायंकाळी यवतमाळ येथे उद्धव ठाकरे यांची सभा पार पडली. भाजप आणि शिवसेना हे दोन वेगवेगळे पक्ष असले तरी त्यांचे विचार एक आहेत. आमच्यात मतभेद असतील. परंतु आमचे कुटुंब एक आहे. त्यामुळे मतभेद बाजुला सारून एक झालो आहोत. यापुढेही ही एकता कायम राहील, अशी ग्वाही ठाकरे यांनी यावेळी दिली.कॉंग्रेस आणि भाजप-सेना या दोन्ही पक्षाचे जाहीरनामे बघा. भाजपच्या जाहीरनाम्यात राममंदिर बांधण्याचे अभिवचन आहे. ३७० कलम कधीही रद्द करण्याची ग्वाही या जाहीरनाम्यातून देण्यात आली आहे. कॉंग्रेसने शेतकऱ्यांचा कळवळा दाखवू नये, ईतकी वर्षे कॉंग्रेसने या देशावर राज्य केले. या काळात शेतकऱ्यांचे काय हाल झालेत, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. कॉंग्रेसच्या कार्यकाळात शेतकऱ्यांसाठी आंदोलन करणारा शिवसेना हा एकमेव पक्ष आहे. त्यामुळे कॉंग्रेसवाल्यांनी भाजप हा पक्ष लालकृष्ण अडवाणींना कशी वागणूक देत आहे, हे पाहण्यापेक्षा जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकºयांना आपण कशी वागणूक दिली, याचा विचार करावा. वागणूक कशी द्यायची हे कॉंग्रेसने आम्हाला शिकवू नये, असेही ठाकरे यांनी यावेळी ठणकावून सांगितले. त्यांनी आपल्या भाषणात शेतकरी आत्महत्या, वणीतील गोळीबार, गोवारी बांधवांना न्यायालयाने दिलेला न्याय आदी मुद्यांनाही हात घातला. माणिकराव ठाकरेंचे डिपॉझिट जप्त होईल, असेही त्यांनी सांगितले. यवतमाळातील सभेच्या व्यासपीठावर डॉ. दीपक सावंत, ना. संजय राठोड, ना. मदन येरावार, खासदार भावना गवळी, आमदार राजेंद्र पाटणी, आमदार प्राचार्य डॉ. अशोक उईके, प्रकाश डहाके, नगराध्यक्ष कांचन चौधरी, किशोर तिवारी तर वणीतील सभेला ना. हंसराज अहीर, आमदार संजीवरेड्डी बोदकुवार, नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, माजी आमदार विश्वास नांदेकर, सुरेश सावंत आदी उपस्थित होते.काँग्रेसचा जाहीरनामा घातककॉंग्रेसचा जाहीरनामा अतिशय घातक असून घटनेतील १२४ कलम रद्द करण्याची भाषा केली जात आहे. हे कलम रद्द केल्यास देशद्रोह्यांवर खटले भरता येणार नाहीत. त्यामुळे जे देशद्रोही असतील तेच कॉंग्रेसला मतदान करतील, असे ठाकरे म्हणाले.

टॅग्स :Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019yavatmal-washim-pcयवतमाळ-वाशिम