शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
5
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
6
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
7
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
9
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
10
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
11
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
12
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
13
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
14
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
15
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
16
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
17
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
18
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
19
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
20
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक

Lok Sabha Election 2019; यवतमाळ-वाशिमसाठी ६२ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 22:20 IST

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी गुरुवारी पहिल्या टप्प्यात मतदान पार पडले. यवतमाळ जिल्ह्यातील चार आणि वाशीममधील दोन अशा सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये एकंदर २२०६ केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार पडली. सायंकाळी ५ पर्यंत ५$४.७१ टक्के मतदान नोंदविण्यात आले.

ठळक मुद्देलोकसभा निवडणूक : ४२.०५ अंशाच्या उन्हातही मतदानाला गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी गुरुवारी पहिल्या टप्प्यात मतदान पार पडले. यवतमाळ जिल्ह्यातील चार आणि वाशीममधील दोन अशा सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये एकंदर २२०६ केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार पडली. सायंकाळी ५ पर्यंत ५$४.७१ टक्के मतदान नोंदविण्यात आले. तर यात आणखी ९-१० टक्क्यांची भर पडून दिवसभराच्या मतदानाची सरासरी ६२ टक्क्यापर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तविण्यात आली. जिल्ह्यात सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्तामुळे मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.गुरुवारी सकाळी ७ वाजतापासूनच मतदान केंद्रांकडे नागरिकांनी धाव घेतली होती. सकाळच्या सत्रात मतदानाची टक्केवारी कमी असली तरी दुपारनंतर ती चांगलीच वाढली. भर उन्हातही बहुतांश केंद्रांवर मतदारांची गर्दी होती. प्रमुख चौकात राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पेंडॉल टाकून मतदारांना चिठ्ठ्या देणे सुरू केले. परंतु, यंदा मतदारयादीतील नावे शोधण्यासाठी निवडणूक विभागाने मोबाईल अ‍ॅप विकसित केल्यामुळे मतदारांचे बरेचसे काम सोपे झाले होते. प्रत्येक मतदानकेंद्रावर सहकुटुंब आलेल्या मतदारांमुळे चहलपहल जाणवली. पती-पत्नी जोडीने येऊन मतदान करणाऱ्यांचे प्रमाण अधिक होते. त्यातच आई-बाबांसोबत आलेल्या चिमुकल्यांनीही मतदानकेंद्रात ‘जिवंतपणा’ आणला. काही चिमुकले तर चक्क आईसोबत बॅलेट युनिटपर्यंत जाऊन आले. दिव्यांग मतदारांसाठी ठेवलेल्या व्हीलचेअर यावेळच्या मतदान प्रक्रियेचे वेगळे वैशिष्ट्य ठरले. अनेक दिव्यांगांसह वयोवृद्धांना त्यामुळे मतदान करणे सोईस्कर झाले. मात्र एकीकडे मतदारांचा उत्साह ओसंडून वाहत असताना अनेक मतदान केंद्रांवरच्या अवव्यस्थेने कळस गाठला.यवतमाळ शहरातील महात्मा फुले शाळेतील केंद्रावर ईव्हीएम मशीन उशिरा सुरू झाली. या गोंधळात सकाळी आलेले ३० मतदार मतदान न करताच परत गेले. अखेर सकाळी साडेसात वाजता येथील मशीन सुरू झाल्यावर मतदानाची प्रक्रिया पुढे जाऊ शकली. त्याचवेळी गर्व्हमेंट हायस्कूलच्या मतदान केंद्रावरील ईव्हीएमही सुरू होत नव्हती. अखेर तज्ज्ञांना पाचारण करावे लागले. या ठिकाणी ‘सेव्हन डिजिट’ची अडचण उद्भवली होती. दाते कॉलेज केंद्रावर पाऊण तास विलंबाने मतदानाला सुरुवात झाली. कळंब तालुक्यातील कोठा येथील केंद्रावरही दोन तास ईव्हीएममधील बिघाड दुरुस्त होऊ शकला नव्हता.तापमानावर स्वार मताधिकार, लोकसभ्यतेचा चमत्कारगुरुवारी सूर्याचा पारा ४२ अंशाच्या पलीकडे पोहोचलेला होता. मात्र या तळपत्या उन्हातही लोकांनी लोकशाहीची सभ्यता पाळत मतदानासाठी मतदान केंद्रांवर धाव घेतली होती. सकाळी अत्यल्प प्रमाणात झालेले मतदान दुपारच्या सुमारासच खºया अर्थाने वाढल्याची बाब निदर्शनास आली. एकीकडे तापमानाचा चढता पारा आणि दुसरीकडे मतदानाची वाढती टक्केवारी अशी स्पर्धाच या निमित्ताने रंगली होती. या स्पर्धेत राष्ट्रीय कर्तव्य जिंकलेयांनी बजावला मतदानाचा हक्कपालकमंत्री मदन येरावार, महसूल राज्यमंत्री संजय राठोड, माजी खासदार विजय दर्डा, खासदार भावना गवळी, काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, आमदार हरिभाऊ राठोड, आमदार मनोहरराव नाईक, आमदार डॉ. वजाहत मिर्झा, आमदार राजू तोडसाम, आमदार ख्वाजा बेग, आमदार डॉ.अशोक उईके, आमदार नीलय नाईक आदींनी मतदान केले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकyavatmal-washim-pcयवतमाळ-वाशिमMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019