शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा-विधानसभा; काँग्रेसचे उमेदवार ठरणार बूथवरून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 14:18 IST

दिल्लीत बसून लोकसभा, विधानसभेचे उमेदवार ठरविण्याची काँग्रेसची अनेक दशकांची परंपरा आता मोडित निघणार आहे. कारण यापुढे हे उमेदवार दिल्लीतून नव्हे तर मतदारसंघातील पक्षाच्या बुथ स्तरावरुन निश्चित केले जाणार आहे.

ठळक मुद्दे‘वन बूथ, टेन युथ’ने युवकांना ‘अच्छे दिन’

राजेश निस्ताने।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दिल्लीत बसून लोकसभा, विधानसभेचे उमेदवार ठरविण्याची काँग्रेसची अनेक दशकांची परंपरा आता मोडित निघणार आहे. कारण यापुढे हे उमेदवार दिल्लीतून नव्हे तर मतदारसंघातील पक्षाच्या बुथ स्तरावरुन निश्चित केले जाणार आहे.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या धर्तीवर काँग्रेसचीही गावखेड्यापर्यंत नव्याने सूक्ष्म पक्षबांधणी केली जात आहे. त्याचे नियंत्रण थेट पक्षाध्यक्ष राहुल गांधी करीत आहे. ‘वन बुथ, टेन युथ’ हा नवा कार्यक्रम काँग्रेस खास युवकांसाठी राबवित आहे.

उमेदवारीत युवकांनाही ‘कोटा’काँग्रेसची ही नवी रचना व बांधणी युवकांना व पक्षातील तळागाळातील कार्यकर्त्यांना ‘अच्छे दिन’ येण्याचे संकेत देत आहे. यापुढे पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्याचे मतही विचारात घेतले जाईल, असे संकेत मिळत आहे. युवकांवर पक्षबांधणीची जबाबदारी देत असतानाच त्यांना सर्वच निवडणुकांमध्ये जागा वाटपात अधिकाधिक स्थान (कोटा) दिले जाणार असल्याचे सांगितले जाते.

दिलेल्या शब्दाची अंमलबजावणीजानेवारीमध्ये दिल्लीत झालेल्या पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात व्यासपीठावर बहुतांश खुर्च्या रिकाम्या ठेवण्यात आल्या होत्या. युवकांसाठी या खुर्च्या मी रिक्त ठेवल्या आहेत, समोर बसलेल्यांमधून सक्षम व्यक्तींना उचलून या खुर्च्यांवर बसविले जाईल, असे त्यांनी सांगितले होते. राहुल गांधींनी दिलेला हा शब्द ‘वन बुथ टेन युथ’च्या माध्यमातून पाळला जात असल्याचे मानले जाते.‘शक्ती अ‍ॅप’द्वारे थेट राहूल गांधींच्या पोर्टलवर कनेक्टीव्हीटीप्रत्येक विधानसभा मतदारसंघात दोनशे ते सव्वादोनशे बुथ राहणार आहे. प्रत्येक बुथला ८०० ते १२०० मतदार कनेक्ट राहतील.या बुथमध्ये दहा सदस्य राहणार आहेत. त्यातील एक बुथ प्रमुख, दुसरा समन्वयक राहणार आहे. उर्वरित आठ सदस्य असतील.या मतदारसंघातील जातनिहाय लोकसंख्येच्या आधारावर बुथ सदस्य म्हणून प्रतिनिधीत्व दिले जाणार आहे. त्यातही युवक आणि ज्येष्ठ असा समतोल साधला जाईल.बुथ सदस्य म्हणून संधी दिल्या जाणाऱ्यांची सर्व पैलूंनी माहिती, रेकॉर्ड, सामाजिक पत, पक्षासाठी योगदान, निष्ठा आदी बाबी तपासल्या जाणार आहे.या बुथच्या सदस्यांना काँग्रेसच्या ‘शक्ती अ‍ॅप’द्वारे थेट राहुल गांधींच्या कार्यालयांच्या पोर्टलवर कनेक्ट केले जाईल.हे कार्यालय केव्हाही या सदस्यांशी संपर्क साधू शकेल. तर हे सदस्यसुद्धा या अ‍ॅपद्वारे थेट राहुल गांधींना आपल्या भागातील पक्षस्थिती, पदाधिकाऱ्यांची कनेक्टीव्हीटी, उपयोगिता, आपल्या क्षेत्रातील समस्या सांगू शकतील.त्या-त्या मतदारसंघाचा लोकसभेचा व विधानसभेचा उमेदवार निश्चित करताना या बुथ सदस्यांची मते, शिफारसी, सूचना आवर्जुन विचारात घेतल्या जाणार आहे. त्यांची मतेही क्रॉस चेक केली जातील.या बुथ मधून येणाऱ्या शिफारसींच्या आधारावरच काँग्रेसचा आगामी लोकसभा व विधानसभेचा उमेदवार निश्चित होणार आहे. यापुढे पक्षाचा कोणताही उमेदवार थेट दिल्लीतून ठरणार नाही, असे काँग्रेसमधील सुत्रांनी सांगितले.

टॅग्स :congressकाँग्रेस