शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
3
मुंबईतील प्रतिष्ठित कॉलेजमध्ये विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबीयांचा गंभीर आरोप
4
इराणसाठी इस्लामिक देश बनले काळ, अमेरिकेने रचला चक्रव्यूह; ४० हजार जवान अलर्टवर
5
IND vs ENG : आम्ही बुमराहला घाबरत नाही! तो सर्वोत्तम गोलंदाज असला तरी... मॅच आधी काय म्हणाला बेन स्टोक्स?
6
यम' समोरून फक्त बघूनच गेले! बोलेरो गाडी हवेत ४ वेळा पलटी झाली; पाहा व्हायरल व्हिडीओ
7
IND vs ENG: पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून खेळणाऱ्या शुबमन गिलला रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, म्हणाले...
8
'देशात लवकरच इंग्रजीत बोलणाऱ्यांना लाज वाटायला लागेल'; अमित शाह यांचे विधान, काय म्हणाले?
9
इराणचे सर्वेसर्वा खामेनेई मुळचे भारतातील...; पणजोबा इराणला गेले, वडिलांनी क्रांती घडविली अन्...
10
अमेरिकेच्या एन्ट्रीची शक्यता! इराण-इस्रायल युद्धाने जगाची चिंता वाढवली, पेट्रोल-डिझेल महागणार?
11
सोन्याची झळाळी झाली कमी; चांदी एका झटक्यात ₹२०६९ नं स्वस्त, पाहा काय आहेत नवे दर
12
इस्रायलविरोधात एकही मुस्लिम देश इराणच्या बाजूने नाही; आता खमेनी सरकारपुढे कोणता मार्ग?
13
ज्येष्ठ योगिनी एकादशी: ‘असे’ करा व्रतपूजन, समस्यांतून व्हाल मुक्त; अपार यश-प्रगती लाभेल!
14
४० जणांच्या जमावाकडून घरावर हल्ला, दगडविटांचा केला वर्षाव, महिला, लहान मुले कुणालाच सोडलं नाही  
15
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
16
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
17
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
18
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
19
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
20
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?

लोहारातील महिला धडकल्या

By admin | Updated: April 28, 2016 02:26 IST

शहरात प्राधिकरणाचे नळ नसलेल्या भागात बोअरवेल आणि विहिरीवर भिस्त होती. आता हे स्रोत कोरडे पडले आहेत.

पाणीटंचाई : नगरपरिषद पाणीपुरवठा सभापतींवर प्रश्नांचा भडीमार, सहा टँकरचा विचारला जाबयवतमाळ : शहरात प्राधिकरणाचे नळ नसलेल्या भागात बोअरवेल आणि विहिरीवर भिस्त होती. आता हे स्रोत कोरडे पडले आहेत. अशा ठिकाणी टँकरशिवाय पर्याय नाही. पाण्याचा गंभीर प्रश्न घेऊन लोहारा गावातील महिलांनी बुधवारी नगरपरिषदेवर धडक दिली. पाणीपुरवठा सभापतींना घेराव घालून आपला रोष व्यक्त केला. नगर परिषदेच्या टँकरवर राजकीय बोर्ड बसे लागले हा प्रश्नही यावेळी उपस्थित करण्यात आला. मोफत पाणी विकत घ्यावे लागत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. दुपारी १२ वाजताच्या सुमारास वार्ड क्रमांक सहा मधील नागरिकांनी नगर परिषदेवर धडक दिली. यामध्ये द्वारकानगरी, तेलंगनगर, मौर्या अपार्टमेंट, रत्नदीपनगर, राधेयनगर, हर्षदीपनगर, पोलीस मित्र सोसायटी आदी भागातील महिलांचा समावेश होता. या भागात मागील दीड महिन्यांपासून पाण्याची भीषण स्थिती आहे. या ठिकाणी जीवन प्राधिकरणाचे नळ नाही. विहीर आणि बोअरवेलचेच पाणी आधार आहे. आता हे स्रोत आटल्याने या भागाची तहान भागविण्यासाठी टँकरशिवाय पर्याय राहिला नाही. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी नगरपरिषदेकडे वारंवार निवेदने दिली. पाणी टंचाईची भीषणता मांडली. यानंतरही नगर परिषदेचे टँकर पोहोचत नाही. हा प्रश्न नागरिकांनी नगरपरिषदेचे आरोग्य सभापती मुन्ना दुबे यांच्याकडे मांडला. नगरपरिषदेचे सहा टँकर लोहाऱ्यात सुरू असल्याचे यावेळी सांगण्यात आले. त्यावर नागरिकांनी राजकीय पक्षाचे बॅनर लागलेले टँकर पालिकेचे आहेत काय, असा प्रश्न उपस्थित केला. टँकरवर पालिकेचे कर्मचारी दिसतात. मात्र त्यांच्या सांगण्यानूसार पाणीपुरवठा केला जात नाही. संबंधित भागातील राजकीय व्यक्तीच्या सांगण्यानुसार पाणीपुरवठा होतो, असा आरोप यावेळी करण्यात आला. आंदोलनाचे नेतृत्व लोहाऱ्याचे माजी सरपंच बबलू देशमुख यांनी केले. यावेळी नंदकिशोर गुल्हाने, सिकंदर शाह, अनिल मांगुळकर, रवी येनप्रेंटीवार, राहुल दारूंडे, हर्षल बोकडे, अक्षय थोटे, नीता गुज्जलवार, पुष्पा नरवाडे, सपना येनप्रेंटीवार, माया तांबे, सारिका वडे, उमा देव्हारे, मनीषा बुटे, अन्नपूर्णा पांडे, गीता जामनकर, वर्षा बोकडे, सुषमा मिश्रा, जयश्री मांगुळकर, वैशाली बलखंडे, अनिता माकोडे आदी सहभागी होते. (शहर वार्ताहर)