लोकमत न्यूज नेटवर्कमारेगाव : तालुक्यातील चार ग्रामपंचायतीमधील संगणक चालकांना कोणतीही सूचना न देता कामावरून कमी केल्याने भाजपाने सोमवारी सायंकाळी पंचायत समितीच्या मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप ठोकून संताप व्यक्त केला. एक तासानंतर प्रवेशद्वाराचे कुलूप काढण्यात आले.शासनाने प्रत्येक ग्रामपंचायतीला संगणक चालकाची नियुक्ती केली आहे. त्यांच्यावर देखरेख ठेवण्यासाठी एक तालुका व्यवस्थापक नेमण्यात आला आहे. या तालुका व्यवस्थापकाने मागील अनेक दिवसांपासून काही संगणक चालकांना असभ्य वर्तन करून त्रास देणे सुरू केले होते, असा आरोप आहे. या बाबत महिला संगणक चालकांच्याही तक्रारी होत्या.काही संगणक चालकांनी याविरोधात आवाज उठविल्याने आकापूरचे प्रदीप काटकर, अर्जुनीचे स्वप्नील कडू, बुरांडा येथील विजयता थेरे व चोपणचे प्रविण नागपुरे यांना कामावरून कमी केले व त्या ठिकाणी नव्याने दुसरे संगणक चालक नेमले. गेल्या दोन महिन्यांपासून हे चारही संगणक चालक न्यायासाठी प्रशासनाकडे चकरा मारीत आहेत. परंतु प्रशासनाने दखल न घेतल्याने त्यांना भाजपाने साथ देत सोमवारी सायंकाळी मारेगाव पंचायत समितीच्या मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप ठोकले. कर्मचाºयांना सामावून घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलकांनी एक तासानंतर दाराचे कुलूप काढले. आंदोलनासाठी भाजपाचे तालुका अध्यक्ष शंकर लालसरे यांनी पुढाकार घेतला.
पंचायत समितीला ठोकले कुलूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 23:46 IST
तालुक्यातील चार ग्रामपंचायतीमधील संगणक चालकांना कोणतीही सूचना न देता कामावरून कमी केल्याने ....
पंचायत समितीला ठोकले कुलूप
ठळक मुद्देमारेगावातील प्रकार : संगणक चालकांना कामावरून कमी केल्याने संताप