शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

कर्ज वाटप, महसुलात जिल्हा राज्यात ‘टॉप’वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 21:52 IST

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जिल्ह्याचा कारभार हाती घेऊन एक वर्ष पूर्ण झाले. या एक वर्षात त्यांनी विविध आघाड्यांवर यश मिळवित जिल्ह्याला राज्यात टॉपवर नेऊन ठेवले आहे.

ठळक मुद्देकलेक्टरची वर्षपूर्ती : झिरो पेन्डन्सीवर भर

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जिल्ह्याचा कारभार हाती घेऊन एक वर्ष पूर्ण झाले. या एक वर्षात त्यांनी विविध आघाड्यांवर यश मिळवित जिल्ह्याला राज्यात टॉपवर नेऊन ठेवले आहे.डॉ. देशमुख यांनी शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्याचे आव्हान स्वीकारून सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांवर प्रशासनाचा फोकस ठेवला. पीक कर्ज वाटपात त्यांनी प्रशासनाचा दणका राष्ट्रीयकृत बँकांना दाखवून दिला. शासनाचे खाते या बँकांमधून काढून सुमारे ५०० कोटींच्या ठेवी वळत्या केल्या. त्यामुळे काहीशा जाग्या झालेल्या या बँकांनी मग पीक कर्ज वाटपात हात सैल केला. त्यामुळे जिल्हा पीक कर्ज वाटपात राज्यात टॉप फाईव्हमध्ये पोहोचला.महसूल, झिरो पेन्डन्सी, ‘गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार’, रेशीम शेती, मत्स्य जिरे निर्मिती, आॅक्सीजन पार्क, वैद्यकीय कक्ष, वॉटर कप, भूसंपादन योजना अशा विविध उपक्रमात जिल्हाधिकाऱ्यांनी झोकून देऊन काम करीत यवतमाळचे नाव राज्याच्या सरकार व प्रशासनात उंचाविले. झिरो पेन्डन्सीवर भर देताना जिल्हाधिकारी कार्यालयातून तीन ट्रक रद्दी काढण्यात आली. आता तालुकास्तरावर त्यासाठी भर दिला जात आहे. फेरफार नोंदी आॅनलाईन करण्यातही राज्यातील २० तालुके ‘टॉप’ आहेत. त्यात १३ तालुके एकट्या यवतमाळ जिल्ह्यातील आहे हे विशेष.