शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
3
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
4
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
5
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
6
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
7
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
8
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
9
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
11
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
12
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
13
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
14
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
15
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
16
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
17
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
18
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
19
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
20
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!

ऐका होऽ ऐकाऽऽ.. पोरांना रोज टीव्ही पाहायला सांगा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 05:00 IST

ऑनलाईन शिक्षणात अडचणी येत असल्याने शासनातर्फे सोमवारपासून टीव्हीवर प्रत्येक वर्गाचा अभ्यासक्रम शिकविला जाणार आहे. त्यासाठी ‘टिलीमिली’ ही खास मालिका सुरू होत आहे. त्याबाबत पोरांना जागृत करण्यासाठी ग्रामपंचायतीने असा पुढाकार घेत गावात चक्क फलकही लावले आहे.

ठळक मुद्देसंडे अँकर । ‘टिलीमिली’साठी ग्रामपंचायतीची दवंडी, गावात फलक, मंदिरातून घोषणा, घरोघरी पत्रके, सोमवारपासून

टीव्हीवर शाळाअविनाश साबापुरे ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : ‘ऐका होऽ ऐकाऽऽ आता दररोज टीव्हीवरून शाळा भरणार आहे. आईबाबांनो, पोरांना रोज टीव्ही पाहायला सांगा...’ अशी दवंडी शनिवारपासून चोंदी ग्रामपंचायतीने सुरू केली आहे. खेड्यापाड्यातील पोरांना ऑनलाईन शिक्षणात अडचणी येत असल्याने शासनातर्फे सोमवारपासून टीव्हीवर प्रत्येक वर्गाचा अभ्यासक्रम शिकविला जाणार आहे. त्यासाठी ‘टिलीमिली’ ही खास मालिका सुरू होत आहे. त्याबाबत पोरांना जागृत करण्यासाठी ग्रामपंचायतीने असा पुढाकार घेत गावात चक्क फलकही लावले आहे.शासनाच्या सह्याद्री वाहिनीवरून ‘टिलीमिली’ मालिकेतून रोज प्रत्येक वर्गाच्या मुलांना शिकविले जाणार आहे. त्याविषयी प्रत्येक विद्यार्थ्याला माहिती व्हावी म्हणून शिक्षक चंद्रबोधी घायवटे यांनी फलक तयार केला, तो ग्रामपंचायतीने गावात लावला. मग सरपंच त्र्यंबकराव उईके आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष उज्ज्वलाताई देवाडे व इतर सदस्यांना बोलावून वर्दळीच्या ठिकाणी हा फलक लावण्यात आला. गावातील जनार्दन आत्राम या युवकाने स्वयंस्फूर्तीने घरा-घरात जावून छापील पत्रके वाटली. या टीव्ही वर्गाचे मुलांना सातत्याने स्मरण होत राहावे यासाठी पुढे दीड महिना गावात दवंडी दिली जाणार आहे. त्यासाठी सीमाताई प्रशांत जांभूळकर मंदिरातून ध्वनिक्षेपकाद्वारे घोषणा करणार आहेत.शिक्षक म्हणतात, ‘मै हूं ना’टिलीमिली या शैक्षणिक टीव्ही मालिकेचे वर्गनिहाय वेळापत्रक फलकावर लिहून तो फलक सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आला. दिलेल्या वेळेवर संबंधित विद्यार्थ्यांनी आपल्या वर्गाचा अभ्यास टीव्हीवर पाहण्याचे आवाहन करण्यात आले. खेड्यात टीव्ही पाहण्यात, चॅनल शोधण्यात अडचण आलीच तर गुरुजींनी फलकावर लिहिले, ‘मै हूं ना... बिनधोक फोन करा !’‘कॉर्नर स्कूल’लाही यशचोंदी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत पहिली ते पाचवीपर्यंत वर्ग असले तरी शिक्षक मात्र एकच आहे. ऑनलाईन शिक्षण कसे द्यावे, हाही प्रश्नच आहे. कारण दोनच पालकांकडे अ‍ॅन्ड्रॉईड फोन. तेही पालकांसोबत शेतावर. शेवटी शिक्षक चंद्रबोधी घायवटे यांनी ‘कॉर्नर स्कूल’ची शक्कल शोधली. दोन-चार मुलं जिथं खेळतात, त्याच ठिकाणाला शिकण्याचे केंद्र बनवले. शेजारी राहणारे व सोबत खेळणारे अशा चार-पाच विद्यार्थ्यांचे गट तयार केले. येथे सोशल डिस्टन्स पाळत अनौपचारिक शिक्षण देण्याची जबाबदारी गावातील शिक्षणप्रेमींवर सोपविली. गाणी, गप्पा, गोष्टी, खेळ या माध्यमातून शिकवणे सुरू झाले. आठवड्यातून एकदा शिक्षक स्वत: भेट देतात.

टॅग्स :Schoolशाळा