शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

बँकग्राहकांना ‘लिंक फेल’चा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 22:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्कआसेगाव(देवी) : मागील चार दिवसांपासून लिंक फेल असल्याने विदर्भ कोकण ग्रामीण विकास बँकेच्या सावर शाखेचे व्यवहार विस्कळीत झाले आहे. पर्यायी व्यवस्था केली असली तरी अनेक ग्राहकांना तांत्रिक अडचणीमुळे पैसा उपलब्ध होत नाही. वरिष्ठांकडून मात्र हा विषय गांभीर्याने घेतला जात नाही.जवळपास २५ गावे या बँकेशी जोडण्यात आलेली आहे. यात ...

ठळक मुद्देग्रामीण बँक : सावर येथील कारभार कर्मचाऱ्यांच्या भरवशावर

लोकमत न्यूज नेटवर्कआसेगाव(देवी) : मागील चार दिवसांपासून लिंक फेल असल्याने विदर्भ कोकण ग्रामीण विकास बँकेच्या सावर शाखेचे व्यवहार विस्कळीत झाले आहे. पर्यायी व्यवस्था केली असली तरी अनेक ग्राहकांना तांत्रिक अडचणीमुळे पैसा उपलब्ध होत नाही. वरिष्ठांकडून मात्र हा विषय गांभीर्याने घेतला जात नाही.जवळपास २५ गावे या बँकेशी जोडण्यात आलेली आहे. यात सावर, कापरा, आसोला, गळव्हा, राणीअमरावती, आसेगाव(देवी), यावली या मोठ्या गावांचा समावेश आहे. व्यापारी, शेतकरी, विद्यार्थी यासह विविध प्रकारचे खातेदार या बँकेचे आहेत. तीन दिवसांपासून लिंक नसल्याने ग्राहकांना येरझारा माराव्या लागत आहे. आजारपण, शेती साहित्य खरेदी करण्यासाठी पैशांची गरज असतानाही या बँकेतून विड्रॉल मिळत नाही. कापरा, आसोला, गळव्हा या गावांसाठी असलेल्या यूएसबीमशीन बँकेत आणून व्यवहार केले जात आहे. मात्र आधार लिंक नसलेले, जोडखाते आदी प्रकारच्या ग्राहकांना या मशीनद्वारे रक्कम मिळत नाही. शिवाय दहा हजारांपेक्षा अधिक रक्कम उपलब्ध होत नाही. दुसरीकडे या मशीन बँकेत आणल्याने कापरा, आसोला, गळव्हा या गावातील नागरिकांना बँकेत हलपाटे मारावे लागत आहे. बँकेत ग्राहकांची गैरसोय होत असताना व्यवस्थापक मात्र यवतमाळहून कारभार सांभाळत असल्याची माहिती आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये रोष आहे.