शहरं
Join us  
Trending Stories
1
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
4
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
5
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
6
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
7
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
8
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
9
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
10
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
11
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
12
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
13
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
15
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
16
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
17
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
18
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
19
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
20
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 

साखर घोटाळ्यात बडे मासे गळाला लागण्याची शक्यता

By admin | Updated: February 27, 2015 01:38 IST

पुरवठा विभाग व काही सक्षम अधिकाऱ्यांच्या संगनमताने २०१२ मध्ये साखर नॉमिनीने रास्त भाव दुकानदारांना मासिक कोट्याची साखर वितरित न करता

उमरखेड : पुरवठा विभाग व काही सक्षम अधिकाऱ्यांच्या संगनमताने २०१२ मध्ये साखर नॉमिनीने रास्त भाव दुकानदारांना मासिक कोट्याची साखर वितरित न करता सर्व नियम ढाब्यावर बसवून १४ लाख १५ हजार रुपये किमतीची ७६५ क्विंटल साखरेची अफरातफर केली. याप्रकरणी तत्कालीन तहसीलदार थोरात व नॉमिनी शैलेश सुरोशे या दोघांविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत. तरी देखील याप्रकरणी कसून पोलीस चौकशी झाल्यास पुरवठा विभागातील काही बडे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे.हा साखर महाघोटाळा अचानकपणे घडलेला नसून अगदी नियोजनबद्ध पद्धतीने घडविण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. जूनपासून डिसेंबर २०१२ पर्यंत हा प्रकार सुरू होता. शुगर नॉमिनी शैलेश सुरोशे याच्याकडून होत असलेल्या घडामोडी व गैरव्यवहारात पुरवठा विभागातील स्थानिक व वरिष्ठ पातळीवरील अधिकारी उघड्या डोळ्यांनी पाहात होते. शुगर नॉमिनीच्या गैरव्यवहाराला वरिष्ठांनी विविध पायबंद घातला असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात हा घोटाळा झाला नसता. महागाव तालुक्यातदेखील ५०० क्विंटल साखर घोटाळाप्रकरणी संबंधित नॉमिनीवर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याच्याच नावावर उमरखेड तालुक्यातही साखर घोटाळा उघडकीस येतो. याचा अर्थ याबाबतचे धागेदोरे जिल्हा पातळीवर वरिष्ठांपर्यंत पोहोचण्याचा निष्कर्ष निघत आहे. या घोटाळ्याबाबतचा अहवाल पुरवठा विभागाने जिल्हा पुरवठा यंत्रणेकडे पाठवूनही त्याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा केल्याची बाब समोर येत आहे. सदर शुगर नॉमिनीच्या संशयास्पद हालचालीबाबत स्वस्त धान्य दुकानदारांनी ओरड केल्यानंतर स्थानिक पुरवठा विभागाने जिल्हा पुरवठा विभागाकडे पाठविलेल्या अहवालाची दखल न घेतल्यामुळे शेवटी हे प्रकरण विभागीय आयुक्तांपर्यंत पोहोचले आणि या घोटाळ्याचे स्वरूप उघड झाले. आता दोघांविरुद्ध गुन्हे दाखल झाले असले तरी या घोटाळ्याकडे दुर्लक्ष करीत दोषींची पाठराखण करणाऱ्या अधिकाऱ्यांचे पितळ उघडे पडू शकते. (प्रतिनिधी)