शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
6
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
7
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
8
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
9
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
10
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
11
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
12
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
13
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
14
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
15
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
16
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
17
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
18
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
19
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
20
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video

प्रकाशच्या खुनात अखेर टेकाम पिता-पुत्रांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 21:58 IST

पांढरकवडा तालुक्याच्या झोटींगधरा येथील प्रकाश आत्राम या युवकाच्या खूनप्रकरणात अखेर शनिवारी रात्री आरोपी टेकाम पिता-पुत्रांना सायखेडा (धरण) येथून अटक करण्यात आली आहे.

ठळक मुद्देझोटींगधरा येथील प्रकरण : सायखेडाधरण येथून आरोपींना केली अटक

लोकमत न्यूज नेटवर्करुंझा : पांढरकवडा तालुक्याच्या झोटींगधरा येथील प्रकाश आत्राम या युवकाच्या खूनप्रकरणात अखेर शनिवारी रात्री आरोपी टेकाम पिता-पुत्रांना सायखेडा (धरण) येथून अटक करण्यात आली आहे.प्रकाश आत्राम या युवकावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. सुमारे दोन महिन्यानंतर हे प्रकरण पांढरकवडा पोलीस ठाण्यात पोहोचले. पोलिसांनी प्रकाशचा जमिनीत पुरलेला मृतदेह बाहेर काढून जागीच उत्तरीय तपासणी केली. त्यानंतर प्रकाशचे पिता आनंदराव आत्राम यांच्या तक्रारीवरून झोटींगधरा येथीलच नंदलाल टेकाम व त्यांची दोन मुले अविदास, गोपाल यांच्याविरुद्ध भादंवि ३०२, ५०७, ३४ कलमान्वये गुन्हा नोंदविला गेला.टेकाम पिता-पुत्र गेल्या काही दिवसांपासून फरार होते. मात्र पांढरकवड्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल कोळी यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार असलम खॉ पठाण यांच्या नेतृत्वातील पथकाने टेकाम पिता-पुत्रांना शनिवारी रात्री अटक केली. त्यांची पोलीस कोठडी मिळविली जाणार आहे. युवकाचा खून करून प्रेत परस्पर जमिनीत पुरल्याच्या या प्रकरणाने रुंझा, मोहदा व झोटींगधरा परिसरात खळबळ निर्माण झाली आहे.या प्रकरणात प्रेत परस्पर जमिनीत पुरुन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र या संबंधीचे कलम तपासादरम्यान लावले जाणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. ठाणेदार असलम खॉ पठाण प्रकरणाचा अधिक तपास करीत आहे.महानिरीक्षकांची पांढरकवड्यात भेटअमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक छगन वाकडे यांनी रविवारी पांढरकवडा येथे भेट दिली. यावेळी त्यांनी पोलीस अधिकाºयांची छोटेखानी आढावा बैठक घेतल्याचे सांगितले जाते. या बैठकीत झोटींगधरा येथील प्रकाश आत्राम खून प्रकरणावरही चर्चा झाल्याचे व महानिरीक्षक वाकडे यांनी तपासाबाबत पोलीस अधिकाºयांना मार्गदर्शन केल्याचे सांगितले जाते. तत्पूर्वी महानिरीक्षकांनी केळापूर येथे जाऊन सहपरिवार दर्शन घेतले.