लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : शहराची जीवनदायिनी म्हणून ओळख असलेल्या पूस नदीला घाणीने विळखा घातला आहे. नदीपात्रात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. मात्र प्रशासनाकडून कोणतीही उपाययोजना होताना दिसत नाही.शहराची जीवनदायिनी म्हणून पूस नदीची ओळख आहे. मात्र ही नदी आपली ओळख हरवत आहे. शहरातून जवळपास तीन ते चार किलोमीटरचा प्रवास ही नदी करते. मात्र शहरातून जाणाऱ्या नदीचे स्वरूप अत्यंत विदारक झाले आहे. पूर्वी ही नदी बारमाही वाहत होती. नदीपात्रात निर्मळ पाणी दिसत होते. जलस्तर उंचावल्याने नागरिकांची तहानही भागत होती. सध्या शहरालगत वाहणाºया नदीपात्रात घाण साचली आहे. लगतच्या वसाहतींमधील गटारांचे सांडपाणी नदीत सोडले जात आहे.शहरातील सर्व घाण नदीपात्रात नेवून टाकली जाते. निर्माल्यही मोठ्या प्रमाणात नदीत सोडले जाते. पावसाळ्यात हे सर्व साहित्य वाहून जाते. मात्र आता पाणी कमी असल्यामुळे सर्व साहित्य जागीच तुंबले आहे. नदीपात्राला कचराकुंडीचे रूप आले आहे. स्वच्छता न केल्यास मोठ्या संकटाची भीती आहे.दुर्गंधीने नागरिक त्रस्तनदीपात्रात सांडपाणी साचून त्याची दुर्गंधी सुटली आहे. पुलावरून जाताना नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. मात्र नदीपात्र स्वच्छतेसाठी कुणीही पुढाकार घेताना दिसत नाही. प्रशासनाही उपाययोजना राबवित नाही. त्यामुळे भविष्यात नदीचे स्वरूप पूर्णपणे बदलण्याची शक्यता आहे.
जीवनदायिनी पूस घाणीच्या विळख्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 05:00 IST
शहराची जीवनदायिनी म्हणून पूस नदीची ओळख आहे. मात्र ही नदी आपली ओळख हरवत आहे. शहरातून जवळपास तीन ते चार किलोमीटरचा प्रवास ही नदी करते. मात्र शहरातून जाणाऱ्या नदीचे स्वरूप अत्यंत विदारक झाले आहे. पूर्वी ही नदी बारमाही वाहत होती. नदीपात्रात निर्मळ पाणी दिसत होते. जलस्तर उंचावल्याने नागरिकांची तहानही भागत होती. सध्या शहरालगत वाहणाºया नदीपात्रात घाण साचली आहे. लगतच्या वसाहतींमधील गटारांचे सांडपाणी नदीत सोडले जात आहे.
जीवनदायिनी पूस घाणीच्या विळख्यात
ठळक मुद्देपुसदकरांचे दुर्लक्ष : नदीपात्रात साचले सांडपाणी, स्वच्छतेची गरज