शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणासाठी जीव धोक्यात

By admin | Updated: July 7, 2014 23:47 IST

दहावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या ग्रामीण विद्यार्थिनींना अहल्याबाई होळकर योजनेतून मोफत प्रवास सवलत आहे़ अकरावी व बारावीतील विद्यार्थिनींना मानव विकास योजनेअंतर्गत मोफत प्रवास सवलत आहे़

‘स्कूल चले हम’ : मानव विकासच्या बसअभावी ट्रकने प्रवास विलास ताजने - शिंदोलादहावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या ग्रामीण विद्यार्थिनींना अहल्याबाई होळकर योजनेतून मोफत प्रवास सवलत आहे़ अकरावी व बारावीतील विद्यार्थिनींना मानव विकास योजनेअंतर्गत मोफत प्रवास सवलत आहे़ परंतु शाळा सुरू होण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेवर बस नसल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शाळेत ये-जा करण्यासाठी प्रचंड हाल होत असल्याचे चित्र दिसून येत आहे़राज्य शासनातर्फे अहल्यादेवी होळकर, मानव विकास योजनेंतर्गत मुलींसाठी एसटीने मोफत प्रवास योजना सुरू करण्यात आली़ गरीब, होतकरू मुलींना शिक्षण घेता यावे, शिक्षणापासून कुणीही वंचित राहू नये, यासाठी ही योजना सुरू करण्यात आली़ परंतु वणी, शिरपूर, शिंदोला या मार्गाने धावणाऱ्या अवैध वाहतुकीमुळे सदर मार्गावरील अनेक बस बंद करण्यात आल्या आहेत. ज्या सुरू आहे, त्यांच्या वेळा विद्यार्थ्यांच्या उपयोगी नाही़ त्यामुळे चारगाव, सेलू, खांदला, कुर्ली, येनक, येनाडी आदी गावातील विद्यार्थ्यांना शिंदोला आणि शिरपूर येथील शाळेत ये-जा करण्यासाठी खासगी जड वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे़ काही ट्रक चालक विद्यार्थ्यांसाठी शाळा ते गाव ये-जा करण्याची सोय करीत आहे़ आॅटोरिक्षा चालक विद्यार्थ्यांकडून अवाजवी प्रवास भाडे घेत असल्याने विद्यार्थी आॅटोने प्रवास करणे टाळतात़ परिणामी विद्यार्थी प्रवास भाडे न घेणाऱ्या ट्रक, ट्रॅक्टर आदी मालवाहू वाहनाने शाळेत ये-जा करणे पसंत करतात़ यामुळे त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे़ वणी आगाराने याची गांभीर्याने दखल घेऊन शिंदोला, शिरपूर मार्गावर शालेय वेळात लहान बस सुरू कराव्या, अशी विद्यार्थी व पालकांची मागणी आहे़