शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या पक्षातील नेत्याची भारताला धमकी; "जर रशियाची मदत केली तर अमेरिका भारतावर..."
2
Live in Partner Murder: प्रेयसी रितिकाची गळा दाबून हत्या, दोन दिवस सचिन मृतदेहाजवळ झोपला; मित्रासोबत दारू प्यायला अन्...
3
...अन्यथा अहमदाबादसारखा अपघात दिल्लीत घडला असता, उड्डाण करताच ९०० फूट खाली आलं एअर इंडियाचं विमान
4
रेल्वे तिकीट बुकिंग, पॅन, ITR सह अनेक नियमांमध्ये बदल; एटीएमच्या वापरावरही शुल्क, जाणून घ्या काय काय बदललं
5
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
6
LPG Cylinder Price Cut: स्वस्त झाला LPG सिलिंडर... आजपासून कमी झाली किंमत; दिल्ली ते मुंबईपर्यंतचे हे आहेत नवे दर
7
काँग्रेसचे १५० नेते रशियाचे एजेंट, परदेशातून मिळायची फंडिंग; भाजपा खासदाराचा खळबळजनक दावा
8
'रामायण'च्या पहिल्या भागाचं शूटिंग पूर्ण, रणबीरची ऑनस्क्रीन लक्ष्मणासोबत गळाभेट; Video व्हायरल
9
Vijay Pendse Dies: इस्रोतील माजी वरिष्ठ शास्त्रज्ञ विजय पेंडसे यांचे निधन
10
सव्वा लाखाची चप्पल? अहो, ही तर आमची कोल्हापुरी!
11
आजचे राशीभविष्य : सरकारी कामात होईल फायदा, प्रमोशनचा योग; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
12
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
13
आता पोटाच्या प्रश्नांकडे वळा!
14
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
15
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
16
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
17
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
18
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
19
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
20
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी

पत्नीला जाळणाऱ्या पतीस जन्मठेपेची शिक्षा

By admin | Updated: January 7, 2015 22:59 IST

साक्षीदार फितूर झाल्याने मृत्यूपूर्व बयाण ग्राह्य धरून दोष सिद्ध झाल्याने पत्नीला पेटवून ठार मारणाऱ्या आरोपीला जन्मठेप आणि ५०० रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली.

यवतमाळ : साक्षीदार फितूर झाल्याने मृत्यूपूर्व बयाण ग्राह्य धरून दोष सिद्ध झाल्याने पत्नीला पेटवून ठार मारणाऱ्या आरोपीला जन्मठेप आणि ५०० रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. या खटल्याचा निकाल येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.टी. बारणे यांच्या न्यायालयाने बुधवारी दिला. सखाराम शिवलाल राठोड (४२) रा. साखरा असे शिक्षा ठोठावलेल्या आरोपीचे नाव आहे. तर निर्मला सखाराम राठोड (३८) असे मृत विवाहितेचे नाव आहे. सखाराम हा माहेरावरून २० हजार रुपये आणण्यासाठी पत्नी निर्मलाच्या मागे तगादा लावायचा. त्यातूनच मद्यधुंदीत तिला बेदम मारहाण करायचा. १९ जून २०१२ ला रात्री ८.३० वाजता तो नेहमीप्रमाणे दारु पिऊन घरी आला. यावेळी त्याने पैशासाठी निर्मलाच्या मागे तगादा लावला. नकार देताच संतप्त झालेल्या सखारामने तिच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिले. त्यामध्ये निर्मला ही ९० टक्के एवढी गंभीररित्या जळाली होती. येथील शासकीय रुग्णालयात तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तत्पूर्वी एएसआय अनिल साने यांनी तिची मृत्यूपूर्व जबाणी घेतली होती. त्यामध्ये पती सखाराम याने पेटवून दिल्याचे तिने सांगितले. मृत्यूपूर्व जबाणीवरून यवतमाळ शहर पोलिसांनी सखाराम याच्याविरुद्ध झिरोवर खुनाचा गुन्हा नोंदविला. तसेच प्रकरण तपासासाठी घाटंजी पोलिसांकडे वर्ग केले. त्यांनी सखारामला अटक करून प्रकरण न्यायप्रविष्ठ केले. हा खटला येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.टी. बारणे यांच्या न्यायालयापुढे चालला. त्यामध्ये एकूण १३ साक्षी तपासण्यात आल्या. त्यातील घटनेचे प्रत्यक्षदर्शी आणि अन्य असे एकूण सहा साक्षीदार फितूर झाले. मात्र न्यायालयाने निर्मलाची मृत्यूपूर्व जबाणी ग्राह्य धरून आरोपी सखारामला शिक्षा ठोठावली. सरकार पक्षाच्यावतीने सहायक सरकारी वकील अ‍ॅड़ नरेंद्र मेश्राम यांनी युक्तीवाद केला. (स्थानिक प्रतिनिधी)