शहरं
Join us  
Trending Stories
1
Assembly Bypoll Result 2025: पोटनिवडणुकांचे निकाल! गुजरातमध्ये एका जागेवर आप भाजपाला टक्कर देतेय; पंजाबमध्ये संजीव अरोरा आघाडीवर
2
नितीशकुमारांची सत्ता धोक्यात? नव्या सर्व्हेतून धक्कादायक 'लाट'; बिहार निवडणुकीपूर्वीच....
3
Maharashtra Politics : ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसणार, भास्कर जाधव मोठा निर्णय घेणार?, संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
4
भारतासोबतच्या सिंधू जल करार वादात OIC ची एन्ट्री; ५७ इस्लामिक देशांचा पाकिस्तानच्या सूरात सूर
5
युनूस यांची खेळी, भारताविरोधी षडयंत्र; बांगलादेशात पाकिस्तानी ISI हस्तकाला मोठी जबाबदारी
6
जगभर: डोनाल्ड ट्रम्प याची 'दादागिरी', अमेरिकेत भारतीय प्राध्यापकांनाही ‘बंदी’!
7
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
8
पुण्याच्या नळ स्टॉप स्टेशनवरुन पकडली मेट्रो, प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला ओळखलंत का?
9
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
10
Iran Israel War: इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम नोकऱ्यांवरही, कंपन्यांमध्ये भरती प्रक्रिया थांबली; कर्मचारीही चिंतेत
11
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
12
Lalit Upadhyay: भारतासाठी दोन ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती!
13
पहिल्या कसोटीत इंग्लंडला एवढ्या धावांचं आव्हान दिल्यास भारताचा विजय निश्चित, असं आहे समीकरण 
14
राज्याचा दर्जा न दिल्यास सर्वोच्च न्यायालयात जाणार; फारुक अब्दुल्ला यांचा केंद्र सरकारला इशारा
15
महागाईचा काळ... बँक FD चे कमी व्याजदर! 'या' ५ सरकारी योजना तुमचं नशीब बदलतील, वाचा संपूर्ण माहिती
16
रॅलीमध्ये कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; जगन मोहन रेड्डींविरोधात गुन्हा दाखल
17
डोईवर विठुमाऊली अन् वारकऱ्यांसह फुगडी; पंढरीच्या वारीतून मराठमोळ्या अभिनेत्रीने शेअर केला व्हिडिओ
18
"रावणाच्या तारखा माझ्यापेक्षा जास्त...", जयदीप अहलावतने दिला 'रामायण'ला नकार
19
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
20
Video: चालत्या ट्रेनमध्ये मारहाण अन् चोरीचा प्रयत्न; अभिनेत्रीसोबत घडली धक्कादायक घटना

नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचा परवाना होणार रद्द

By admin | Updated: July 8, 2015 00:07 IST

जिल्ह्यात अवैध मद्यविक्रीवर पूर्णपणे प्रतिबंध घालण्यासोबतच परवानाधारक विक्रेत्यांवर नियंत्रण असणे आवश्यक आहे.

अवैध दारू विक्रीवर बंदी : परवानाधारक दारू दुकानांवर वॉचयवतमाळ : जिल्ह्यात अवैध मद्यविक्रीवर पूर्णपणे प्रतिबंध घालण्यासोबतच परवानाधारक विक्रेत्यांवर नियंत्रण असणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील मद्यविक्रीची दुकाने नियमांचे पालन करत नसतील अशी दुकाने तातडीने निलंबित करा, अशा सुचना पालकमंत्री संजय राठोड यांनी केल्या.पालकमंत्र्यांनी महसूल भवन येथे राज्य उत्पादन शुल्क विभागासह जलयुक्त शिवार, पीक कर्ज वाटप आदींचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या. बैठकीस जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंग तसेच संबंधीत विभागाचे अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यात दारुबंदीने जोर पकडला आहे. बंदीबाबतचा निर्णय हा शासनस्तरावरचा आहे. असे असले तरी प्रशासन या बाबतीत संवेदनशील असल्याचे दिसले पाहिजे. जिल्ह्यात कोणत्याही प्रकारे अवैध मद्यविक्री होता कामा नये. परवानाधारक दुकाने नियमांचे पालन करीत नसल्याचे वारंवार दिसून येत आहे. मद्यविक्रीबाबत दुकानांकडून वेळेचे पालन होत नाही. अनेक ठिकाणी काही विक्रेते सकाळपासून मद्यविक्रीस प्रारंभ करतात. रात्री उशिरापर्यंत मद्य विक्री चालत असल्याचे वारंवार आढळून आले आहे. शासनाच्या नियमांचे प्रत्येकाने पालन करणे आवश्यक आहे. असे पालन होत नसल्यास दुकाने निलंबित करा. गरज पडल्यास कायमस्वरूपी परवाने रद्द विशिष्ठ विक्रेते मद्याच्या पेट्या ग्रामीण भागात नेवून तेथे विक्री करीत असल्याच्या तक्रारी आहे. अशा दुकानांवर लक्ष ठेवून कार्यवाही केली जावी. उत्पादन शुल्क विभागाने आठवड्यात याबाबत केसेस करणे आवश्यक असल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले. जिल्ह्यातील मद्यविक्रीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्व दुकानांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लावण्याची सुचना पालकमंत्र्यांनी केली. दुकानदारांनी स्वत:हुन सीसीटीव्ही लावल्यास त्यांच्याही सोईचे होणार असल्याने यासाठी त्यांनी पुढाकार घेण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.जिल्ह्यातील पूर्ण झालेल्या व सुरु असलेल्या जलयुक्त शिवार अभियानातील कामांचा आढावा घेतला. या योजनेतील कामे गुणवत्तापूर्वक होणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्व कामांची पाहणी व गुणवत्ता तपासण्याचे निर्देश त्यांनी दिले. (कार्यालय प्रतिनिधी)