शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

तीन कृषी केंद्रांचे परवाने रद्द तर तिघांचे निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2020 05:00 IST

परवाना निलंबित झालेल्यांमध्ये यवतमाळ शहराच्या दत्त चौक परिसरातील बबलू गुप्ता यांचे कृषी कल्पतरु, संजय कोषटवार यांचे सुदर्शन कृषी केंद्र व राम जाजू यांचे जाजू कृषी केंद्र यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हक्काचे सोयाबीन बियाणे जिल्ह्याबाहेर कोपरगाव-शिर्डी पर्यंत नेऊन विकल्याचा ठपका गुप्ता यांच्या कृषी कल्पतरु केंद्रावर आहे.

ठळक मुद्देएका कृषी केंद्राला ताकीद : बोगस सोयाबीन, बनावट खत विक्रीचा ठपका

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : बोगस आणि उगवण क्षमता नसलेले सोयाबीनचे बियाणे विकणाऱ्या तीन कृषी केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहे. तर बनावट खत प्रकरणात तीन कृषी केंद्रांचा परवाना रद्द करण्यात आला.परवाना निलंबित झालेल्यांमध्ये यवतमाळ शहराच्या दत्त चौक परिसरातील बबलू गुप्ता यांचे कृषी कल्पतरु, संजय कोषटवार यांचे सुदर्शन कृषी केंद्र व राम जाजू यांचे जाजू कृषी केंद्र यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हक्काचे सोयाबीन बियाणे जिल्ह्याबाहेर कोपरगाव-शिर्डी पर्यंत नेऊन विकल्याचा ठपका गुप्ता यांच्या कृषी कल्पतरु केंद्रावर आहे. त्यामुळे त्यांचा परवाना सहा महिन्यांसाठी निलंबित करण्यात आला. तर सुदर्शन व जाजू यांचा परवाना एक ते दोन महिन्यांसाठी निलंबित केला गेल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयातून ‘लोकमत’ला सांगण्यात आले.याशिवाय तीन कृषी केंद्रांचे परवाने थेट रद्द करण्यात आले. महागाव तालुक्याच्या काळीदौलत येथील गौरी शंकर कृषी केंद्रावर बोगस सोयाबीन बियाणे विक्रीचा ठपका ठेवण्यात आला. नेर तालुक्याच्या मांगलादेवी येथील कृहनिका कृषी केंद्र आणि दिग्रस तालुक्याच्या तिवरा येथील बावणे कृषी केंद्राचा परवाना बनावट रासायनिक खत विकल्याप्रकरणी रद्द करण्यात आला आहे.कृषी प्रगती केंद्रात अनेक त्रुट्यायवतमाळातील विलास बोगावार यांच्या कृषी प्रगती केंद्राला सक्त ताकीद देण्यात आली आहे. कृषी विभागाच्या तपासणीत तेथे अनेक त्रुट्या आढळून आल्या होत्या. मात्र त्या सौम्य स्वरूपाच्या होत्या. त्यातील बहुतांश त्रुट्यांची त्यांनी पूर्तता केली, साठा रजिस्टर भरले. त्यामुळे त्यांना केवळ ताकीद देण्यात आली.जिल्हाभर बोगस सोयाबीन बियाणे विकले जात असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते. यवतमाळातील ठोक विक्रेत्यांकडून हे बियाणे विकले गेले. काहींनी कृत्रिम टंचाई करून जादा दराने बियाणे विकले तर कुणी जिल्ह्याबाहेर कंपनीतून परस्पर बियाणे विक्रीसाठी पाठविले. या वृत्ताची दखल घेऊन कृषी विभागाने शहरात ठोक बियाणे विक्रेत्यांच्या दुकान व गोदामांची तपासणी केली होती.परवाना रद्द व निलंबन केलेल्या प्रकरणात कृषी विभागाच्या तपासणीत अनेक गंभीरबाबी आढळून आल्या. साठा रजिस्टर न मिळणे, कागदपत्रे अपडेट नसणे, बियाणे खरेदी केल्याची कागदपत्रे उपलब्ध नसणे, जिल्ह्याबाहेर माल विकणे, उगवण क्षमता नसलेले बियाणे शेतकºयांच्या माथी मारणे आदी गैरप्रकार आढळून आले.बनावट रासायनिक खताचा भंडाफोडकृषी विभागाने दिग्रस येथे बनावट रासायनिक खताची विक्री सुरू असल्याचा भंडाफोड केला होता. हे खत एसटी महामंडळाच्या पार्सल गाडीने गडचिरोली जिल्ह्यातून यवतमाळ जिल्ह्यात आणले जात होते व नामांकित खत म्हणून जादा दरात शेतकऱ्यांच्या माथी मारले जात होते. हे खत विकणारे दोन कृषी केंद्रांचे परवाने रद्द करण्यात आले.यवतमाळ तालुक्यात सर्वाधिक तक्रारीयवतमाळ व आर्णीतील ठोक बियाणे विक्रेत्यांकडून जिल्ह्याच्या सोळाही तालुक्यात बियाण्यांची विक्री केली गेली. जयस्वाल कृषी केंद्रातून यवतमाळ तालुका व परिसरात बियाणे विकले गेले. तेथूनच बियाणे न उगविल्याच्या सर्वाधिक तक्रारी शेतकऱ्यांनी नोंदविल्या.आर्णीतून बियाणे थेट उमरखेड व परिसरापर्यंतआर्णीच्या कृषी वैभव केंद्रातून उमरखेड व परिसरात सर्वाधिक बियाणे विक्री झाली व तक्रारीही तेवढ्याच मोठ्या प्रमाणात झाल्याची माहिती कृषी विभागातील सूत्रांनी दिली.मीडियाच्या एन्ट्रीने दत्त चौकातून पथक माघारीया तपासणीसाठी कृषी विभागाचे तत्कालीन मोहिम अधिकारी व दक्षता अधिकाऱ्यांचे पथक दत्त चौकातील जयस्वाल कृषी केंद्रावरही धडकले होते. मात्र त्याच वेळी तेथे इलेक्ट्रॉनिक मीडियाची चमू धडकल्याने कृषी विभागाने ही तपासणी नंतर करू असे म्हणून त्यावेळी कारवाई टाळली. परंतु नंतर या दुकानाची तपासणी झालीच नाही.‘बीगबजेट’ पार्ट्याच तपासणीतून सुटल्या !अशाच पद्धतीने आर्णी येथील कृषी वैभव या ठोक बियाणे विक्रेत्याचीही तपासणी केली गेली नाही. ‘बीग बजेट’ पार्ट्याच कृषी विभागाच्या तपासणीतून सुटल्याने आश्चर्य व्यक्त केले जाते. या केंद्रांना अभय देण्यामागील ‘रहस्य’ गुलदस्त्यात आहे.

टॅग्स :agricultureशेती