शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

आधी प्रेमाने सांगू, नंतर शिवसेना स्टाईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 22:02 IST

जनतेने आपल्याला लोकप्रतिनिधी म्हणून निवडले आहे. त्या जनतेचा प्रथम आदर करतो. जनता आपल्या कामासाठी प्रशासनाचे उंबरठे झिजवते. अधिकाऱ्यांनी जनतेच्या कामांना प्राधान्य द्यावे. अन्यथा आपल्याकडे तक्रार आल्यास आधी प्रेमाने आणि नंतर शिवसेना स्टाईलने अधिकारी, कर्मचाऱ्यांना उत्तर दिले जाईल, असा इशारा खासदार हेमंत पाटील यांनी दिला.

ठळक मुद्देखासदारांचा इशारा : महागाव येथे रसाळी कार्यक्रमात टोलेबाजी

लोकमत न्यूज नेटवर्कमहागाव : जनतेने आपल्याला लोकप्रतिनिधी म्हणून निवडले आहे. त्या जनतेचा प्रथम आदर करतो. जनता आपल्या कामासाठी प्रशासनाचे उंबरठे झिजवते. अधिकाऱ्यांनी जनतेच्या कामांना प्राधान्य द्यावे. अन्यथा आपल्याकडे तक्रार आल्यास आधी प्रेमाने आणि नंतर शिवसेना स्टाईलने अधिकारी, कर्मचाऱ्यांना उत्तर दिले जाईल, असा इशारा खासदार हेमंत पाटील यांनी दिला.येथे आयोजित जाहीर सत्कार व रस पोळी जेवणाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. तालुक्यातील रखडलेले सिंचन प्रकल्प, शेतकऱ्यांना कर्ज वाटप, घरकुलाचे रखडलेले हप्ते, कृषीपंपांना वीज पुरवठा, अशा किती तरी मागण्याचे निवेदन लोकांनी खासदार पाटील यांना दिले. खासदार पाटील यांनी प्रशासनाकडून तालुक्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा अनुशेष जाणून घेतला. नंतर आमदारांच्या मदतीने लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या तालुक्यातील अनुशेष दूर करण्याची ग्वाही दिली.दर तीन महिन्याला जनता दरबार, तालुका तेथे जनसंपर्क कार्यालय राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अधिकाऱ्यांना सांगितलेल्या कामाचा आढावा जनता दरबारातून घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक मताधिक्य महागाव-उमरखेड विधानसभा मतदार संघाने दिले. याची आपण कायम जाणीव ठेवणार असल्याचे खासदार पाटील यांनी सांगितले. आमदार राजेंद्र नजरधने, शिवसेना जिल्हा प्रमुख पराग पिंगळे, माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर, डॉ.विश्वनाथ विणकरे, भाविक भगत, जगदीश नरवाडे, रामराव नरवाडे, समाधान ठाकरे, प्रमोद भरवाडे, सुदाम खंदारे, सुनील नरवाडे, अशोक तुमवार, लक्ष्मीबाई पारवेकर, सीमा जाधव, उज्वला भारती, नीलू सोयाम आदी मंचावर उपस्थित होत्या.

टॅग्स :Hemant Patilहेमंत पाटील