शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

विदेशातही वाघिणीसाठी ‘लेट अवनी लिव्ह’ मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 8:18 PM

येथील नरभक्षक वाघिणीला पकडण्यासाठी सुरू असलेल्या नवनवीन प्रयोगांबाबत भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील राज्याच्या वनखात्यावर सडकून टीका होत आहे.

ठळक मुद्देदिल्ली, हैदराबादमध्येही पडसाद

योगेश पडोळे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील नरभक्षक वाघिणीला पकडण्यासाठी सुरू असलेल्या नवनवीन प्रयोगांबाबत भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील राज्याच्या वनखात्यावर सडकून टीका होत आहे. इंग्लंड, अमेरिका, फ्रान्सच्या नागरिकांनी समाज माध्यमांवरुन एकूणच या कार्यपद्धतीवर टीका केली आहे तर कॅनडातील भारतीयांनी तेथील शॉपिंग मॉलमध्ये निदर्शने केली. आता भारतासोबतच आंतरराष्ट्रीय स्तरावरही ‘लेट अवनी लिव्ह’ या नावाने वाघिणीच्या बचावासाठी मोहीम सुरू झाली आहे.वाघिणीला बेशुद्ध करुन जेरबंद करण्यासाठी २२ सप्टेंबरपासून वनखात्याने तब्बल २०० लोकांना घेऊन मोहीम सुरू केली आहे. मात्र, महिना लोटला तरी यश आले नाही. त्यामुळे वनखात्याच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले जात आहेत. वाघिणीला जेरबंद करण्यासाठी आधी हत्ती, नंतर घोडे, इटालियन श्वान, पॅरामोटर्स आणि आता डुकरांचा वापर करण्यात येत आहे. मात्र, कुत्रे आणि डुकराचा वापर चुकीचा असल्याची टीका होत आहे. डुकरांमुळे संसर्गजन्य आजार पसरण्याची शक्यता पशुवैद्यकीय अधिकारी व्यक्त करीत आहेत.या सर्व प्रयोगांची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवरही घेण्यात आली आहे. इंग्लंडमधील डॅन रिचर्डसन यांनी थेट प्रक्षेपणाद्वारे मौल्यवान वाघीण आणि तिचे बछडे धोकादायक स्थितीत असून त्यांना वाचवा म्हणून आवाहन केले आहे. त्यासाठी त्यांनी स्वाक्षरी मोहीम देखील राबविली. पहिल्याच प्रक्षेपणात तब्बल ४७ हजार स्वाक्षरी झाल्या. त्या ५० हजारांपर्यंत जातील असा विश्वास त्यांनी समाज माध्यमांवरुन व्यक्त केला आहे. लंडनमधील आठ वर्षीय स्कार्लेट रॉबर्टसन या मुलीने देखील समाजमाध्यमांवरुन वाघिणीला वाचविण्याचे आवाहन केले आहे. विशेष म्हणजे, देहरादूनच्या भारतीय वन्यजीव संस्थेच्या फेसबुक पेजवरुन देखील ‘लेट अवनी लिव्ह’ या मोहिमेला समर्थन देण्यात आले आहे.

दिल्ली, हैदराबादमध्येही पडसादआतापर्यंत नागपूरसह दिल्ली, मुंबई, गोवा, सिलिगुडी, कोलकाता येथे या वाघिणीला वाचविण्यासाठी मोहीम राबवण्यात आली. १४ आॅक्टोबरला दिल्लीच्या पालिका बाजार येथून, बंगलोरच्या टाऊन हॉल येथून, पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून ‘रोअर्स फॉर अवनी’, ‘सेव्ह टायग्रेस अवनी’, ‘लेट अवनी लिव्ह’ अशा नावानी मोहीम राबविण्यात आली. हैदराबादच्या डॉग्स पार्क येथून १४ आॅक्टोबरला, तर केबीआर पार्क येथून १५ आॅक्टोबरला ही मोहीम राबविण्यात आली आहे.

टी-१ म्हणजेच अवनीपांढरकवड्यातील या वाघिणीला वन खात्याने ‘टी-१’ हे नाव दिले आहे. परंतु या परिसरातील ही वाघीण ‘अवनी’ याच नावाने ओळखली जाते. त्यामुळे या मोहिमेला देखील ‘लेट अवनी लिव्ह’ हेच नाव देण्यात आले आहे.

टॅग्स :Tigerवाघ