शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

कर्ज मेळाव्याकडे बँकांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 21:43 IST

तालुक्यातील अंजनखेड येथे शनिवारी अर्ज द्या-कर्ज घ्या मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याकडे बँकांनी पाठ फिरविल्याने सकाळपासून उपस्थित शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.

ठळक मुद्देअर्ज द्या-कर्ज घ्या : अंजनखेड परिसरातील शेतकरी संतापले

लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : तालुक्यातील अंजनखेड येथे शनिवारी अर्ज द्या-कर्ज घ्या मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याकडे बँकांनी पाठ फिरविल्याने सकाळपासून उपस्थित शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.अंजनखेड ग्रामपंचायत कार्यालयात शनिवारी मंडळातील शेतकऱ्यांसाठी अर्ज द्या-कर्ज घ्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. परिसरातील शेकडो शेतकरी मेळाव्याला आले होते. मात्र तेथे साधी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नव्हती. मंडळ अधिकारी जे.के. जयस्वाल, मंडळातील तीन तलाठी यावेळी उपस्थित होते. मात्र बँकेचे अधिकारी शेवटपर्यंत आलेच नाही. मंडळ अधिकारयांनी बँक अधिकाऱ्यांशी संपर्क केला. मात्र बँकेकडून उडवाउडवीची उत्तरे दिली गेली.यानंतर स्वत: तहसीलदारांनी बँकेशी संपर्क साधला. तरीही बँकेचे प्रतिनिधी आले नाही. एकप्रकारे शासनाच्या धोरणाला बँकेकडून मूठमाती दिली गेली. बँकांच्या या आडमुठ्या धोरणामुळे शेतकरी भरडले जात आहे. ऐन पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यांना कर्जासाठी भटकंती करावी लागत आहे.लोकप्रतिनिधी केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. यामुळे मेळाव्याला उपस्थित शेतकऱ्यांनी प्रचंड संताप व्यक्त केला.जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घ्यावीअंजनखेड येथे शेतकरी मेळावा व मार्गदर्शनासाठी उपस्थित शेतकºयांनी आता जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेण्याची मागणी केली. शेतकऱ्यांना सहज आणि सुलभरित्या कर्ज मिळावे म्हणून असे मेळावे घेतले जातात. मात्र त्याबाबत बँंका उदासीन आहे. या बँकांना जिल्हाधिकाऱ्यांनी वठणीवर आणावे, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली. शनिवारी शेतकऱ्यांना तास न् तास प्रतीक्षा करूनही स्टेट बँकेने उदासीनता दाखविली. बँकेच्या संबंधितांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.

टॅग्स :bankबँकCrop Loanपीक कर्ज