शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळमध्ये बिबट्याचे कातडे, काळविटाचे शिंग जप्त; वन विभागाची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2020 15:41 IST

डीएफओंच्या नेतृत्वात धाड, एकाला अटक 

सोनखास (यवतमाळ): यवतमाळचे उपवनसंरक्षक भानुदास पिंगळे यांच्या नेतृत्वात शनिवारी सकाळी १०.३० वाजता वन अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या २५ ते ३० जणांच्या पथकाने उत्तरवाढोणा येथे धाड घातली. या धाडीत तीन वर्ष वयाच्या बिबटाचे कातडे आणि काळविटाचे शिंग जप्त करण्यात आले. या प्रकरणी गजानन वामन कुनगर (४५) रा. उत्तरवाढोणा याला अटक करण्यात आली आहे. वन कोठडी मिळविण्यासाठी त्याला न्यायालयापुढे उपस्थित केले जाणार आहे. गजाननने हे चामडे व शिंग कोठून मिळविले, त्याने स्वत: शिकार केली की अन्य कुणाकडून आणले याचा शोध नेरचे वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद कोहळे यांचे पथक येणार आहे. उत्तरवाढोणा येथे बिबटाची शिकार करून अवयव शेतात तर चामडे घरात दडवून ठेवल्याची टीप वन विभागाला मिळाली. त्यावरून उपवनसंरक्षक पिंगळे यांच्या नेतृत्वात शनिवारी धाड घालण्यात आली. शेतात शोध घेतला असता बिबटाचे अवयव मिळून आले नाही. मात्र घरात गोठ्यातील पांढऱ्या पिशवीत बिबटाचे कातडे, काळविटाचे शिंग आढळून आले. वन विभागाने ते जप्त केले. तीन वर्ष वयाचा हा बिबट असून २० ते २५ दिवसांपूर्वी त्याची शिकार झाली असावी असा वन अधिकाºयांंचा अंदाज आहे. तर काळविटाचे शिंग शेतात सापडले असण्याची शक्यताही वनविभागाने वर्तविली. गजानन कुण्या शिकाºयांच्या टोळीत तर सहभागी नाही ना, त्याने यापूर्वी आणखी अशा काही शिकारी केल्या का याचा शोध घेण्याचे आव्हान वन पथकापुढे आहे. पिंगळे यांच्या नेतृत्वातील धाड पथकात उपविभागीय वन अधिकारी मकरंद गुजर, सहायक वनसंरक्षक एस. अर्जुना, नेरचे वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद कोहळे, दारव्ह्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी चेतन नेहारे, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रिया गुल्हाने, भरारी पथक तसेच वनपाल व वनरक्षक यांचा समावेश आहे.