शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

आमदाराच्या दत्तक गावात दिव्यांगांची परवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 22:24 IST

दुर्गम भागात राहात असलेल्या दिव्यांगांना त्यांच्या कल्याणकारी योजनांची माहिती मिळावी यासाठी पंचायत समितीमध्ये महिन्याच्या तिसऱ्या मंगळवारी बैठक घेतली जाते. जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी यावेळी आवर्जून उपस्थित राहतात.

ठळक मुद्देसमाज कल्याण अधिकारी : पंचायत समितीत दिव्यांग बांधव ताटकळत

दत्तात्रय देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : दुर्गम भागात राहात असलेल्या दिव्यांगांना त्यांच्या कल्याणकारी योजनांची माहिती मिळावी यासाठी पंचायत समितीमध्ये महिन्याच्या तिसऱ्या मंगळवारी बैठक घेतली जाते. जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी यावेळी आवर्जून उपस्थित राहतात. उमरखेडमध्ये मात्र आमदारांच्या दत्तक गावातीलच दिव्यांगांची परवड सुरू आहे. समाज कल्याण अधिकाऱ्याच्या प्रतीक्षेत दिवसभर दिव्यांग ताटकळत होते.तालुक्यात विकास योजनांचा बट्ट्याबोळ सुरू आहे. प्रशासनावर लोकप्रतिनिधींचा वचक नाही. समाज कल्याण अधिकाºयांपुढे आपल्या योजनांच्या लाभातील अडचणी मांडाव्या यासाठी मोरचंडी व आकोली येथील दिव्यांग बांधव पंचायत समितीत पोहोचले. विशेष म्हणजे मोरचंडी हे गाव आमदार राजेंद्र नजरधने यांनी दत्तक घेतले आहे. त्यानंतरही येथील दिव्यांगांना आपला हक्क मिळविण्यासाठी तालुका पंचायत समिती कार्यालयात यावे लागले. महिन्याचा तिसरा मंगळवार असल्याने जिल्हा समाज कल्याण अधिकारी येतील व आपल्या अडचणी दूर करतील या आशेवर हे दिव्यांग बांधव दिवसभर बसून होते. मात्र कुठलीही पूर्वसूचना न देता समाज कल्याण अधिकारी आलेच नाही. यामुळे दिव्यांग बांधवांची घोर निराशा झाली. दोनही पाय नसलेले दामू चव्हाण, उत्तम राठोड, सावित्री भुरके, दादाराव गाडेकर, आनंद पलकोंडवार, गजानन हाके, गणेश तिरकमदार, गुलाब जाधव या सर्व दिव्यांग बांधवांना शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागला. शासनाने दिव्यांगांसाठी स्वतंत्र बजेट केले असून ठराविक निधी आरक्षित केला आहे. हा निधीच जाणीवपूर्वक खर्च केला जात नाही. दिव्यांगांना त्यांचा अधिकार देण्यात टाळाटाळ केली जाते. किमान हा प्रकार सत्ताधारी आमदाराच्या दत्तक गावातील दिव्यांगांबाबत होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. मात्र प्रशासकीय अधिकारी मुजोर झाल्याने कोणालाच जुमानत नसल्याचे दिसून येते.आमदारावर अधिकारी शिरजोरदत्तक ग्राम ही संकल्पना राज्य शसनाकडून राबविली जात आहे. आमदारांनी दत्तक घेतलेल्या गावात शासनाच्या विविध योजनांचा लाभ घरपोच मिळावा, हा त्यामागचा उद्देश आहे. प्रत्यक्ष मात्र उमरखेड तालुक्यात आमदारांचेच दत्तक गावाकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते. त्यामुळेच दिव्यांग बांधवांना शारीरिक मर्यादा सहन करत आपल्या हक्कासाठी घराबाहेर पडावे लागत आहे.

टॅग्स :panchayat samitiपंचायत समितीgovernment schemeसरकारी योजना