शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थिनींना जंगलात सोडून बस परतली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 23:10 IST

रस्ता दयनीय असल्याचे कारण देत समग्र शिक्षा अभियानाची एसटी बस विद्यार्थिनींना चक्क जंगलात सोडून परत गेली. ही घटना तालुक्यातील करंजखेड येथे बुधवारी सायंकाळी उघडकीला आली. करंजखेड येथील अनेक विद्यार्थिनी महागावला शिक्षणासाठी येतात.

ठळक मुद्देकरंजखेडची घटना : समग्र शिक्षा अभियानाची एसटी बस

लोकमत न्यूज नेटवर्कमहागाव : रस्ता दयनीय असल्याचे कारण देत समग्र शिक्षा अभियानाची एसटी बस विद्यार्थिनींना चक्क जंगलात सोडून परत गेली. ही घटना तालुक्यातील करंजखेड येथे बुधवारी सायंकाळी उघडकीला आली.करंजखेड येथील अनेक विद्यार्थिनी महागावला शिक्षणासाठी येतात. बुधवारी सायंकाळी शाळा सुटल्यानंतर करंजखेडला परतण्यासाठी सर्व विद्यार्थिनी समग्र शिक्षा अभियान्याच्या एसटी बसने गावी जात होत्या. करंजखेडपासून दोन किलोमीटर अंतरावर रस्ता दयनीय असल्याचे कारण देत चालकाने एसटी बस पुढे नेण्यात नकार दिला. विद्यार्थिनींना जंगलात उतरून देण्यात आले. अखेर विद्यार्थिनींनी दीड किलोमीटरपर्यंत पायदळ प्रवास करून घर गाठले.महागाव - करंजखेड या पाच किलोमीटर अंतरात रस्ता बांधकाम कंपनीच्या गौण खनिज वाहतुकीमुळे हा रस्ता कमालीचा दयनीय झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून रिपरिप पावसामुळे रस्त्यालगतचे झाड कोसळले.त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाल्याने एसटी बस पुढे जात नव्हती. चालकाने आपल्याला विचारून हा निर्णय घेतल्याचे करंजखेडचे सरपंच प्रवीण ठाकरे यांनी सांगितले.

टॅग्स :Studentविद्यार्थी