शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
2
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
3
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
5
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
6
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
7
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
9
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
10
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
11
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
12
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
13
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
14
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
15
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
16
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
17
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
18
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
19
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
20
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 

जातीचा विचार सोडा, ओबीसी समजून लढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2022 05:00 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे ओबीसींचे राजकीय आरक्षण टिकविण्यासाठी इंपिरिकल डेटा गोळा करणे किंवा केंद्र सरकारने ओबीसीची जातनिहाय जनगनना करणे आवश्यक आहे. राज्य सरकारने हा डेटा गोळा करण्याचे काम राज्य मागास आयोगाकडे सोपवले आहे. मात्र, यासाठी  ३५० कोटींचा निधी राज्य सरकार देत नाही. भाजपचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्र सरकारकडून ओबीसींचा डेटा आणत नाही, असे प्रा. देवरे म्हणाले.

लाेकमत न्यूज नेटवर्कनेर : सर्वच राजकीय पक्षाला सत्तेचा मोह आहे. यामुळे ते ओबीसी आरक्षणाबाबत उदासीन आहे. ओबीसींनी आपल्या घरापासून आरक्षणाची चळवळ शोधून दुसरा राजकीय पर्याय शोधला पाहिजे. मी तेली, मी माळी, मी न्हावी, असा जातीचा विचार सोडून ओबीसी समजून प्रत्येकाने लढा देण्याची गरज आहे, असे विचार ओबीसींचे राष्ट्रीय वक्ते प्रा. श्रावण देवरे यांनी मांडले. येथील विश्रामगृहात त्यांनी पत्रकारांशी वार्तालाप केला. प्रा. देवरे म्हणाले, ओबीसींच्या सन १९९०  पूर्वीच्या चार पिढ्यांनी मोठ्या कष्टाने आरक्षण मिळविले. स्वामी पेरियार, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, त्यागमूर्ती चंदापुरी, ललनसिंह यादव, शहीद जगदेव प्रसाद, बाबू कुशवाहा, ॲड. जनार्दन पाटील यासारख्या अनेकांचा ओबीसींच्या आरक्षणासाठी मोठा त्याग आहे. जननायक कर्पुरी ठाकूर, माधवसिंग सोलंकी, व्ही.पी. सिंग यासारख्या नेत्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. आज ओबीसी आरक्षण संपविले जात असताना एकही ओबीसी मंत्री राजीनामा देत नाही, ही शरमेची बाब आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे ओबीसींचे राजकीय आरक्षण टिकविण्यासाठी इंपिरिकल डेटा गोळा करणे किंवा केंद्र सरकारने ओबीसीची जातनिहाय जनगनना करणे आवश्यक आहे. राज्य सरकारने हा डेटा गोळा करण्याचे काम राज्य मागास आयोगाकडे सोपवले आहे. मात्र, यासाठी  ३५० कोटींचा निधी राज्य सरकार देत नाही. भाजपचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्र सरकारकडून ओबीसींचा डेटा आणत नाही, असे प्रा. देवरे म्हणाले. यावेळी शोभा श्रावण देवरे यांच्यासह नरेंद्र गद्रे, गणेश राऊत, उमेश इंगोले, राजेश धोटे आदी उपस्थित होते.

...तर एकही पक्ष उमेदवारी देणार नाहीn ओबीसी आरक्षण नष्ट करणाऱ्या पक्षातील ओबीसी नेते आपल्या पदाचा राजीनामा का देत नाही, असा सवालही या पत्रकार परिषदेत प्रा. देवरे यांनी केला. सावध व्हा आणि राजकीय पर्याय शोधा. अन्यथा ओबीसी वोटबँक नष्ट होऊन त्या दिवशी मुंडे, भुजबळ, पटोले, वडेट्टीवार, बावनकुळे या ओबीसी नेत्यांना एकही पक्ष नगरसेवकांचे तिकीटही देणार नाही. ग्रामपंचायतपासून लोकसभेपर्यंत एकही ओबीसी निवडून येणार नाही. सर्व राजकीय पक्ष ओबीसीचे शत्रू आहेत, हे सिद्ध झाले आहे, असाही आरोप प्रा. श्रावण देवरे यांनी केला. दलित, आदिवासी, ओबीसीच्या समाज कल्याण मंत्रालयाचे १०८ कोटी रुपयेसुद्धा काढून घेतले असल्याचे ते म्हणाले.

 

टॅग्स :OBC Reservationओबीसी आरक्षणOBCअन्य मागासवर्गीय जाती