शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
7
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
8
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
9
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
10
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
11
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
12
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
13
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
14
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
15
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
16
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
17
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
18
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
19
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

महाविकास आघाडी, भाजपसह १५ उमेदवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2020 06:00 IST

विधान परिषदेत महाविकास आघाडीकडून कोण उमेदवार उतरविला जाणार याची उत्सुकता होती. स्थानिक स्वराज्य संस्थेतील संख्याबळात महाविकास आघाडी सरस ठरणारी आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवाराकडे सर्वांचे लक्ष होते. शिवसेनेकडूनच महाविकास आघाडीचा उमेदवार देण्यात आला. नागपूर येथील दुष्यंत सतीश चतुर्वेदी यांनी नामांकन दाखल केले.

ठळक मुद्देविधान परिषद निवडणूक : अखेरच्या दिवशी उमेदवारांंचे शक्तिप्रदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषदेची पोटनिवडणूक होत आहे. मंगळवार हा नामांकन दाखल करण्याचा अखेरचा दिवस असल्याने महाविकास आघाडी, भाजपच्या उमेदवारासह १५ जणांनी नामांकन दाखल केले. यावेळी प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी शक्तिप्रदर्शन करीत जिल्हाधिकारी कार्यालय गाठले होते.विधान परिषदेत महाविकास आघाडीकडून कोण उमेदवार उतरविला जाणार याची उत्सुकता होती. स्थानिक स्वराज्य संस्थेतील संख्याबळात महाविकास आघाडी सरस ठरणारी आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवाराकडे सर्वांचे लक्ष होते. शिवसेनेकडूनच महाविकास आघाडीचा उमेदवार देण्यात आला. नागपूर येथील दुष्यंत सतीश चतुर्वेदी यांनी नामांकन दाखल केले.यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख, वनमंत्री तथा शिवसेनेचे स्थानिक नेते संजय राठोड, ऊर्जामंत्री नितीन राऊत, शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर, खासदार बाळू धानोरकर, राष्टÑवादीचे जिल्हाध्यक्ष आमदार ख्वाजा बेग, काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. वजाहत मिर्झा, माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, मनोहरराव नाईक, माणिकराव ठाकरे, अ‍ॅड. शिवाजीराव मोघे, प्रा. वसंत पुरके, माजी आमदार वामनराव कासावार, विजय खडसे, कीर्ती गांधी, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख माजी आमदार विश्वास नांदेकर, पराग पिंगळे, राजेंद्र गायकवाड, समीर देशमुख आदी उपस्थित होते. नामांकन दाखल केल्यानंतर सर्वच नेते मंडळींनी विजय निश्चित असल्याचे सांगून मिठाईचे वाटपही केले.भाजपकडून विधान परिषदेचा उमेदवार कोण याचा काऊंटडाऊन शेवटच्या क्षणापर्यंत सुरू होता. अखेर सुमित बाजोरिया यांनी भाजपकडून नामांकन अर्ज दाखल केला. सोबतच जगदीश वाधवाणी यांनीसुद्धा नामांकन दाखल केले. यावेळी आमदार मदन येरावार, आमदार अशोक उईके, आमदार अ‍ॅड. नीलय नाईक, आमदार डॉ. संदीप धुर्वे, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, आमदार नामदेव ससाने, भाजप जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा, नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांच्यासह भाजपचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. स्थानिक स्वराज्य मतदारसंघातील मतदार बाहेरचा उमेदवार यावेळी निवडणार नाही, असा विश्वास भाजपच्या नेत्यांनी व्यक्त केला.या प्रमुख उमेदवारांसह उमरखेड काँग्रेसचे शहर अध्यक्ष नंदकिशोर अग्रवाल, यवतमाळातील काँग्रेसचे नगरसेवक जावेद अन्सारी, दिग्रस येथील अपक्ष नगरसेवक शेख जावेद, महाराष्टÑ विकास आघाडीकडून संजय देरकर, प्रशांत पवार, शिवसेनेचे माजी आमदार बाळासाहेब मुनगीनवार, महागाव येथून आरिफ सुरैय्या, दीपक निलावार, राजू दुधे, शंकर बडे, नूर महंमद खान, सतीश भोयर आदींनी नामांकन अर्ज दाखल केले.शुक्रवारी होणार लढतीचे चित्र स्पष्टनामांकन अर्ज मागे घेण्यासाठी शुक्रवार १७ जानेवारी ही अंतिम मुदत आहे. पक्षाच्या चिन्हावर मतदान होत नाही. पसंतीक्रमाने मतदान करावे लागते. त्यामुळे आर्थिक दृष्ट्या सबळ असलेला आणि स्थानिक मतदारांमध्ये प्रभावी ठरणाऱ्या उमेदवाराचे पारडे जड राहणार आहे. नामांकन मागे घेतल्यानंतरच लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.अनुमोदकासाठीच घोडेबाजारनामांकन दाखल करताना दहा मतदारांचे अनुमोदन आवश्यक आहे. त्यांच्या स्वाक्षºया मिळविण्यासाठीच घोडेबाजार झाला. आर्थिक दिग्गज रिंगणात आल्याने पहिल्या दिवसापासूनच स्थानिक स्वराज्य संस्थेतील मतदारांचे भाव वधारले आहे. स्वाक्षरी करण्यासाठीही अनेकांनी टोकण घेतल्याची चर्चा रंगत आहे.भाजपची उमेदवार मिळविण्यातच दमछाकभाजपला विधान परिषदेसाठी उमेदवार मिळवितानाच दमछाक झाली. महाविकास आघाडीने नकारलेला उमेदवार भाजपने रिंगणात उतरविला आहे. भाजपच्या दडपशाहीच्या धोरणाला सर्वच जण ओळखून आहेत. त्यामुळे विधान परिषदेत महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा विजय निश्चित असल्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी ‘लोकमत’ला सांगितले. तर गृहमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी महाविकास आघाडीतील पक्षातून बंडखोरी झाल्यास त्यांच्याविरुद्ध पक्षनेतृत्व कारवाई करेल अशी प्रतिक्रिया देत महाविकास आघाडीचा विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त केला.

टॅग्स :BJPभाजपा