शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
5
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
6
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
7
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
8
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
9
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
10
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
11
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
12
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
13
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
14
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
15
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
16
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
17
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
18
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
19
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
20
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?

नव्या तरुणांकडे नेतृत्व द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 9:46 PM

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला शासनकर्ती जमात व्हा, असा संदेश दिला. अनेक जण शासनात गेलेही, पण अनेकांनी केवळ ‘लिडरशिप’ करण्यात धन्यता मानली.

ठळक मुद्देचंद्रकांत हंडोरे : आंबेडकरी श्रमिक साहित्य संमेलनाचे उद्घाटन

ऑनलाईन लोकमतयवतमाळ : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला शासनकर्ती जमात व्हा, असा संदेश दिला. अनेक जण शासनात गेलेही, पण अनेकांनी केवळ ‘लिडरशिप’ करण्यात धन्यता मानली. आता ६५ वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या नेत्यांना बाद करा आणि बाबासाहेबांच्या विचारांना मानणाºया तरुणांकडे नेतृत्व द्या, असे आवाहन माजी सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी केले.शनिवारी येथील बचत भवनात दुसऱ्या आंबेडकरी श्रमिक साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. संमेलनाध्यक्ष प्रसेनजित ताकसांडे, प्रमुख अतिथी विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, स्वागताध्यक्ष संजय मानकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी, हेमंत कांबळे, आनंद गायकवाड, भीमशक्ती संघटनेचे अविनाश भगत, सुनिल भेले, बळी खैरे आदी उपस्थित होते.यावेळी हंडोरे म्हणाले, अशा साहित्य संमेलनातून श्रमिकांच्या वेदना समोर आल्या पाहिजे. आरक्षणातून होणाºया पदोन्नत्या थांबविण्याच्या हालचाली सुरू आहे. रिक्त जागा रद्द करण्याचा डाव आखला जात आहे. अशावेळी आपली भूमिका मांडून श्रमिकांच्या प्रश्नांना वाचा फोडलीच पाहिजे.विधान परिषद उपसभापती माणिकराव ठाकरे म्हणाले, शेतमजुरांचे जगणे मी स्वत: पाहिले आहे. पण आजही श्रमिकांना कष्टमय जीवन जगावे लागत आहे. आरक्षित प्रवर्गातील गुणवंतांना सध्या खुल्या गटातून अर्ज करण्यावर बंदी घातली जात आहे. आरक्षणाचा लाभ मिळू नये म्हणून खासगीकरण वाढविले जात आहे. हा अन्याय दूर करण्यासाठी श्रमिक संमेलनातून आवाज उठविला जावा.संमेलनाध्यक्ष प्रसेनजित ताकसांडे म्हणाले, सौंदर्यवादी साहित्यिकांनी लेखक आणि जनता यात दुरावा निर्माण केला. मी केवळ माझ्या आनंदासाठी लिहितो असे म्हणण्यात काही अर्थ नाही. समाजाच्या भल्यासाठीच साहित्यिकांनी लेखन केले पाहिजे.प्रास्ताविक आनंद गायकवाड यांनी केले. संचालन सुनिल वासनिक यांनी केले. तर आभार सुमेध ठमके यांनी मानले. संदेश वाचन संदीप नगराळे, साहेबराव कदम यांनी केले. यावेळी बळी खैरे आणि संजय ओरके यांच्या ‘पोस्टर पोएट्री’ या आगळ्या प्रदर्शनाचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.यावेळी प्रा. संजय वानरे, प्रेम हनुवते, प्रा. विलास भवरे, कवडुजी नगराळे, दिलीप भोजराज, भाई सुकदाने, अविनाश भगत, प्रा. अशोक कांबळे, अ‍ॅड. प्रदीप वानखडे, गोपीचंद कांबळे, सतीश राणा, संजय ढोले, प्रा. युवराज मानकर, सुनील पुनवटकर, संजय बोरकर, डॉ. सुभाष जमधाडे, भीमराव गायकवाड, दीपक नगराळे, अजय गोरकार, आनंद डोंगरे, सरस्वती जोगळेकर, ज्योती खोब्रागडे, मालती गायकवाड, रंजना ताकसांडे, सुषमा डोंगरे आदींची उपस्थिती होती.