लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : अनेक पूरग्रस्तांना अद्यापही शासनाकडून तातडीची मदत मिळाली नसल्याच्या निषेधार्थ पूरग्रस्तांनी येथील तहसीलसमोर धरणे आंदोलन केले. मागणीचे निवेदन तहसीलदारांना सादर केले.१६ आॅगस्टला झालेल्या अतिवृष्टीने अनेकांच्या घरात पाणी शिरले. पूरग्रस्तांना शासनाकडून तातडीने १२ तासाच्या आत मदत मिळणे अपेक्षित होते. तसे शासन आदेश आहे. मात्र आजपर्यंतही अनेक पूरग्रस्तांना मदत मिळाली नाही. त्यामुळे त्यांच्यात असंतोष निर्माण झाला आहे. भारतीय कम्युनिस्ट पार्टीने या पूरग्रस्तांवरील अन्यायाच्या निषेधार्थ तहसीलसमोर एक दिवसीय धरणे आंदोलन केले.दिग्रस वगळता आर्णीसह विविध तालुक्यातील आपत्तीग्रस्तांना मदत मिळाली आहे. मात्र येथील अनेक पूरग्रस्त अद्यापही मदतीपासून वंचित आहे. त्यांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी पी.जी. गावंडे, किशोर कदम, बी.एम. शेख, शेख जाफर, शरद मासूळकर, दादाराव पंडागळे, ज्ञानेश्वर गोरे, शेख कद्रूस, किसान डोईफोडे, प्रल्हाद महल्ले, जयचंद चव्हाण, मनोज इंगळे, शंकर लोखंडे आदींनी केली. मागणीचे निवेदन नायब तहसीलदार संजय राठोड यांना देण्यात आले.
पूरग्रस्तांचे दिग्रस तहसीलसमोर धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2018 22:33 IST
अनेक पूरग्रस्तांना अद्यापही शासनाकडून तातडीची मदत मिळाली नसल्याच्या निषेधार्थ पूरग्रस्तांनी येथील तहसीलसमोर धरणे आंदोलन केले. मागणीचे निवेदन तहसीलदारांना सादर केले.
पूरग्रस्तांचे दिग्रस तहसीलसमोर धरणे
ठळक मुद्देभाकपाचा पुढाकार : तातडीची मदत मिळालीच नाही, मात्र इतरत्र मदतीचे वितरण