गृहराज्यमंत्र्यांची उपस्थिती : नाणे व हस्तकला प्रदर्शन आर्णी : येथील महंत दत्तराम भारती विद्यालयातील राजकमल भारती सभागृहाचे लोकर्पण आणि हस्तकला व नाणे प्रदर्शनाचे उद्घाटन गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी आले. अध्यक्षस्थानी दत्तप्रसादिक शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. संजय भारती होते. प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष अर्चना मंगाम, कोषाध्यक्ष प्रियदर्शन भारती, मनोज माहुरे, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे, माजी नगराध्यक्ष आरीज बेग, जिल्हा परिषद सदस्य प्रवीण शिंदे, मन्नान बेग, प्राचार्य डॉ. गोपाल अग्रवाल उपस्थित होते. यावेळी बोलताना गृहराज्यमंत्री पाटील म्हणाले, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने विविध उपक्रम आयोजित करणारे भारती विद्यालयाचे कार्य गौरवास्पद आहे. डॉ. संजय भारती यांनी आर्णी शहरातील पाणी पुरवठा, रस्त्यांचे रुंदीकरण आदी समस्या मांडल्या. कार्यक्रमात आर्णीच्या प्रथम महिला नगराध्यक्ष अर्चना मंगाम यांचा गृहराज्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर डॉ. पाटील यांनी राजकमल भारती कला, वाणिज्य महाविद्यालय व सुशिलाबाई भारती विज्ञान महाविद्यालयाला भेट देऊन पहाणी केली. कार्यक्रमाला मुख्याध्यापक ईश्वर दुग्गड, सुनील पद्मावर आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
राजकमल भारती सभागृहाचे लोकार्पण
By admin | Updated: January 9, 2017 02:13 IST