गिरीराज सिंह : राळेगाव येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शनराळेगाव : सोयाबीनचे उत्पादन या भागात मोठ्या प्रमाणात होते. सोयाबीनमध्ये मुबलक प्रमाणात प्रोटीन्स व शरीराला अत्यावश्यक इतर घटक आहेत. त्यामुळे सोयाबीनवरील प्रक्रिया उद्योगांना चालना देण्याचे शासनाचे धोरण आहे. पंतप्रधानांच्या प्रयत्नामुळे देशात लहान-लहान ११ लाख उद्योग सुरू करण्यात येत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग विभागाचे राज्यमंत्री गिरीराज सिंह यांनी केले. येथे एका सोया प्लांटचे उद्घाटन करून ते जाहीर सभेत बोलत होते. ते म्हणाले, लहान उद्योगांच्या निर्मितीसाठी, विकासासाठी मुद्रा बँकेची स्थापना शासनाद्वारे करण्यात आली आहे. उद्योजकांनी आपापल्या उद्योगातून उत्पादन सुरू करणे, उत्पादन वाढविणे, मार्केटींग करण्यासोबतच बँकेची कर्जफेड नियमित करण्याचा हितोपदेश त्यांनी केला. देशातील पाच कोटी महिलांना रोजगार देण्याचे केंद्र शासनाचे उद्दिष्ट आहे. ज्या ठिकाणी कापसाचे उत्पादन होते, त्याठिकाणी कापड बनविण्याच्या मशिनरी शासन स्थापन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी काळात देशात ६५ टक्के नवतरुणांचा हा देश नवजवानांचा देश होणार असून त्यांच्या हातात कौशल्यता देऊन विकास साधण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे ना. गिरीराज सिंह म्हणाले. याप्रसंगी केव्हीआयसीचे ए.एन. झा यांनीही समयोचित मार्गदर्शन केले. (तालुका प्रतिनिधी)‘...अच्छे दिन की शुरुवात’मागील काही दिवसांपासून ठिकठिकाणी अनेकजण शासनाला विचारतात ‘अच्छे दिन की शुरूवात कब’ यावर ना. गिरीराज सिंह यांनी सोया प्लांटचे उद्घाटन करून ‘रालेगाव में आज से हुई अच्छे दिन की शुरुवात’ असे सांगत अनेकांच्या प्रश्नांना उत्तर दिले.
प्रक्रिया उद्योगांना चालना
By admin | Updated: May 2, 2015 23:58 IST