शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस लाईन मोजतेय अखेरच्या घटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 22:28 IST

ग्रामपंचायतची नगरपरिषद होऊन दहा वर्षांचा कालावधी निघून गेला. शहरात नवीन प्रशासकीय इमारती झाल्या, नवी शासकीय निवासस्थाने बनली. मात्र मागील ५० वर्षांपासून पोलीस मोडक्या घरात संसार करताहेत.

ठळक मुद्देनेर येथील जीर्ण घरे : ५० पोलीस परिवारांसाठी २३ क्वॉर्टर, नवीन वसाहतीची गरज

किशोर वंजारी ।लोकमत न्यूज नेटवर्कनेर : ग्रामपंचायतची नगरपरिषद होऊन दहा वर्षांचा कालावधी निघून गेला. शहरात नवीन प्रशासकीय इमारती झाल्या, नवी शासकीय निवासस्थाने बनली. मात्र मागील ५० वर्षांपासून पोलीस मोडक्या घरात संसार करताहेत. घराचे छत केव्हा कोसळेल याचा नेम राहिला नसल्याने पोलीस व त्यांच्या कुटुंबीयांचा जीव टांगणीला लागला आहे.विविध प्रशासकीय इमारती नेर शहराच्या वैभवात भर टाकणाऱ्या आहे. पोलीस वसाहत मात्र दुर्लक्षित आहे. दोन रुमचे, तेही मोडकळीस आलेले क्वॉर्टर. घरावरील कवेलू कधी पडेल, कुणाच्या शरीराला इजा पोहोचवेल, कुणाचा जीव घेईल याचा नेम नाही. भिंतीतून पाणी झिरपते. वसाहती सभोवताल कचºयाचे ढिगारे, वाढलेली झाडे आहेत. शौचालयाची दुरावस्था झाली आहे. एका कुटुंबातील चार सदस्यांना राहणे या घरात कठीण जाते.नेर पोलीस ठाण्याची इमारत व वसाहत १९१९ मध्ये बांधण्यात आली. या पोलीस ठाण्यात ४५ पोलीस आणि पाच अधिकारी आहते. पोलिसांसाठी २९ क्वार्टर आहेत. यातील चार क्वार्टरचे आयूष्य संपले तर, दोन क्वार्टर नादूरूस्त आहे. पंचायत समिती, तहसील कार्यालय नवीन, आधुनिक पध्दतीने होणार आहे. बसस्थानक जिल्ह्यात ओळखले जाईल, असे असणार आहे. मग पोलिसांसाठी सुविधापूर्ण क्वार्टर का बांधले जात नाही, हा प्रश्न आहे.शांतता व सुव्यवस्था ठेवण्याची जबाबदारी पोलिसांची आहे. मात्र फुटलेल्या कौलारू घरात, पडक्या भिंतीत राहणाऱ्या या कर्मचाऱ्यांना सतत चिंता लागलेली असते. पोलीस अधीक्षकांनी येथील पोलीस वसाहतीत सुधारणेच्या दृष्टीने उपाययोजना कराव्या, अशी मागणी होत आहे.इंग्रज राजवटीतील घरेनेर येथे १९१९ मध्ये पोलीस ठाणे सुरू झाले. ठाणेदार व पाच पोलीस उपनिरीक्षक येथे कार्यरत आहे. गोपनीय विभाग व तालुक्यातील बीट सांभाळणारे जमादार यांच्यासाठी हे पोलीस स्टेशन लहान आहे. पोलीस ठाण्यातून कामकाज कसेतरी चालते. स्वातंत्र्यापूर्वीचे हे पोलीस स्टेशन आहे. याची दैना कधी दूर होईल, हे पाहणे महत्वाचे आहे.

टॅग्स :Policeपोलिस