शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
3
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
4
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
5
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
6
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
7
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
8
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
9
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
10
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
11
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
12
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
13
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
14
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
15
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
16
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
17
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
18
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
19
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
20
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...

नामांकनासाठी शेवटच्या दिवशी उसळली गर्दी

By admin | Updated: October 30, 2016 00:09 IST

नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्याचा शनिवार शेवटचा दिवस होता.

नगरपरिषद लढत : आठ नगराध्यक्ष, २१४ जागांसाठी चुरसयवतमाळ : नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्याचा शनिवार शेवटचा दिवस होता. त्यामुळे आठही नगरपरिषद क्षेत्रात नामांकन दाखल करण्यासाठी एकच गर्दी उसळली होती. निवडणूक आयोगाने एक तास वेळ वाढवून दिल्याने तसेच आॅफलाईन अर्ज स्वीकारण्यात आल्याने अनेकांना दिलासा मिळाला. शेवटच्या दिवसापर्यंत नगरसेवकांच्या २१४ जागांसाठी अनेकांनी अर्ज दाखल केले. आठ नगराध्यक्ष पदांसाठी १०२ अर्ज दाखल झाले आहेत. नामांकन परत घेण्याची अंतिम तारीख ११ नोव्हेंबर आहे. प्रारंभी दोन दिवस निवडणूक आयोगाचे संकेतस्थळ जाम होते. यामुळे अनेक उमेदवारांना अर्ज दाखल करता आले नाही. यानंतर २६ आॅक्टोबरपासून नामांकन दाखल करण्याच्या प्रक्रियेला वेग आला. मात्र अनेक पक्षांचे उमेदवारच निश्चित न झाल्याने इच्छुकांना अर्ज दाखल करता आले नाही. पक्षाच्या उमेदवारीची त्यांना प्रतीक्षा होती. पक्षांनी ऐन शेवटच्या दिवशी उमेदवारी घोषित केल्याने शेवटच्या दिवशी सर्वाधिक नामांकन अर्ज दाखल झाले. शनिवारी पक्षाचा ए, बी फॉर्म मिळविण्यासाठी कार्यकर्त्यांनी आपापल्या पक्ष कार्यालयात एकच गर्दी केली होती. शेवटच्या क्षणी काही इच्छुकांना डावलण्यात आल्याने सर्वच पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये ‘कही खुशी, कही गम‘ असे चित्र दिसत होते. पक्षाच्या ए.बी. फॉर्मसाठी उमेदवारांनी शेवटच्या क्षणापर्यंत फिल्डींग लावली होती. यवतमाळात भरली जत्राशेवटच्या दिवशी यवतमाळात भाजपातर्फे रेखा, शिवसेनेच्या कांचन बाळासाहेब चौधरी, राष्ट्रवादीच्या रचना राजेश पाटील यांच्यासह शबाना शेख शकील, सुनंदा विश्वास वालदे, मनीषा वसंत तिरणकर, किरण प्रकाश मेश्राम, वंदना सुधाकर घायवान, ज्योती गौतम खोब्रागडे, जरीना अब्दुल गफार मनियार, शामलता गौतम तायडे यांनी नगराध्यक्षपदासाठी उमदेवारी अर्ज दाखल केले. (शहर वार्ताहर)नगरपरिषदनिहाय दाखल उमेदवारी अर्जयवतमाळ नगरपरिषदेच्या ५६ जागांसाठी ४४१ अर्ज दाखल झाले, तर नगराध्यक्षपदासाठी १३ महिला उमेदवारांनी १७ अर्ज दाखल केले. वणी नगराध्यक्षपदासाठी १९ अर्ज दाखल झाले, तर नगरसेवकांसाठी दाखल झालेल्या अर्जाचे चित्र उशिरापर्यंत स्पष्ट झाले नव्हते. पुसद नगरपरिषदेच्या २९ जागांसाठी २०२, तर नगराध्यक्ष पदासाठी ५ अर्ज दाखल झाले आहे. दिग्रस येथे २३ जागांसाठी १६२, तर नगराध्यक्षासाठी १६ अर्ज दाखल झाले. उमरखेड येथे २४ जागांसाठी १७५, तर नगराध्यक्ष पदासाठी १४ अर्ज सादर झाले. दारव्हा नगरपरिषदेच्या २० जागांसाठी १५३ तर नगराध्यक्ष पदासाठी १४ अर्ज आले आहे. आर्णी येथे १९ जागांसाठी १२७, तर नगराध्यक्ष पदासाठी ६ अर्ज दाखल झाले. घाटंजी नगरपरिषदेच्या १७ जागांसाठी १३५, तर नगराध्यक्ष पदासाठी १२ अर्ज आले आहेत.