शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

भूमाफियांनी २५ हजार चौरस फूट भूखंड हडपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 21:47 IST

भूमाफियांनी लोहारा-वाघापूर बायपासवरील २५ हजार चौरस फुटाचा भूखंड बनावट मालक उभा करून बोगस खरेदीद्वारे परस्पर हडपल्याचे खळबळजनक प्रकरण उघडकीस आले आहे. मूळ भूखंड मालकाने या प्रकरणाची तक्रार लोहारा पोलीस ठाणे आणि ‘एसआयटी’कडे (विशेष तपास पथक) केली आहे.

ठळक मुद्दे‘एसआयटी’कडे तक्रार : राकेश टोळीचा कारनामा, बनावट मालक उभा करून खरेदी, कागदपत्रेही बोगस

राजेश निस्ताने।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : भूमाफियांनी लोहारा-वाघापूर बायपासवरील २५ हजार चौरस फुटाचा भूखंड बनावट मालक उभा करून बोगस खरेदीद्वारे परस्पर हडपल्याचे खळबळजनक प्रकरण उघडकीस आले आहे. मूळ भूखंड मालकाने या प्रकरणाची तक्रार लोहारा पोलीस ठाणे आणि ‘एसआयटी’कडे (विशेष तपास पथक) केली आहे.गजानन नरहरी धोंडगे (५०) रा. संभाजीनगर, मेहकर जि. बुलडाणा असे यातील तक्रारकर्त्याचे नाव आहे. २१ जुलै रोजी लोहारा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या या तक्रारीत गैरअर्जदार म्हणून राकेश दीपक यादव रा. पवारपुरा, भोसा रोड यवतमाळ, नीलेश लहुराव बनोरे रा. जामनकरनगर उमरसरा यवतमाळ, नीलेश वलजीभाई उनडकर रा. हनुमान आखाडा चौक, यवतमाळ व इतर अज्ञात आरोपींचा नामोल्लेख आहे. लोहारा पोलिसांनी ही तक्रार अधिक चौकशीसाठी विशेष तपास पथकाचे प्रमुख यवतमाळचे उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप यांच्याकडे पाठविल्याचे सांगण्यात आले.लोहारा ते वाघापूर बायपासवर गजानन धोंडगे यांच्या मालकीचा २५ हजार ७३०.९३ चौरस फुटाचा भूखंड आहे. त्याचा गट क्र.१०/३/अ, प्लॉट क्रमांक १, २, ११, १२ व १३ असा आहे. यवतमाळात भूखंड माफियांकडून मालमत्ता खरेदी-विक्रीचे बोगस व्यवहार सुरू असल्याचे वृत्त धोंडगे यांच्यापर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून पोहोचले. म्हणून त्यांनी आपल्या भूखंडांची खातरजमा करण्यासाठी २० जुलै रोजी तलाठ्याचे लोहारा येथील कार्यालय गाठले. तेथून सातबारा मिळविला असता तो वाचून धोंडगे यांना धक्काच बसला. कारण या सातबारावर भूखंड मालक म्हणून राकेश दीपक यादव यांचे नाव नोंदविले गेले होते. या व्यवहारात नीलेश बनोरे व नीलेश उनडकर हे खरेदीच्या वेळी साक्षीदार असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. २१ जुलै रोजी धोंडगे यांनी तलाठी कार्यालयातून पुन्हा सर्व कागदपत्रे ताब्यात घेतली. तेव्हा राकेश व अन्य दोन साक्षीदारांनी अज्ञात बनावट व्यक्ती भूखंड मालक म्हणून दुय्यम निबंधक (खरेदी-विक्री) कार्यालयात उभा केला. त्याद्वारे २५ हजार चौरस फुटाचा भूखंड स्वत:च्या नावे दीपकने करून घेतला. हे खरेदी खत नोंदविताना खोटे आधारकार्ड, बनावट पॅनकार्ड, बनावट स्वाक्षरीचा वापर केला गेला. त्याचा फेरफारही (क्र.२०८६१) अशाच बनावट पद्धतीने केला गेला. या व्यवहारात महसूल, भूमिअभिलेख, दुय्यम निबंधक कार्यालयातील यंत्रणा गुंतलेली असल्याचे सांगून त्यांचा शोध घेण्याची मागणी पोलिसांकडे दाखल तक्रारीत करण्यात आली आहे.अडीच कोटींच्या भूखंडावर सात कोटींचे कर्ज !राकेश यादव याने धोंडगे यांचा २५ हजार चौरस फुटाचा भूखंड बोगस पद्धतीने केवळ स्वत:च्या नावावरच केला नसून त्यावर तब्बल सात कोटी रुपयांचे कर्ज उचलल्याचा प्रकारही पुढे आला. या कर्जाचा बोझा सातबारावर पहायला मिळतो आहे. ज्याची मालकीच नाही, त्या भूखंडावर एवढ्या मोठ्या प्रमाणात बँकांनी कर्ज दिलेच कसे हा ‘एसआयटी’साठी खरा संशोधनाचा विषय आहे. राकेशने या भूखंडांवर सर्वप्रथम एका बँकेतून तीन कोटींचे कर्ज उचलले. नंतर हाच भूखंड दुसऱ्या एका बँकेत गहाण ठेऊन त्यावर चार कोटींचे कर्ज उचलले गेले. आधी भूखंड मालकाची व नंतर त्याच भूखंडावर दोन बँकांची फसवणूक केली गेली. याच भूखंडाचा राकेशने आणखी तिसºयाशी व्यवहार केल्याचीही चर्चा आहे. राकेश तसेच त्याच्या टोळीतील मंगेशचे असे अनेक कारनामे पाठोपाठ उघड होत आहेत. त्यांच्या या साखळीतील बँकींग व शासकीय यंत्रणेत दडून असलेल्या घटकांचाही लवकरच पर्दाफाश होणार आहे. काही जुन्या रियल इस्टेट ब्रोकरनेसुद्धा या भूखंड घोटाळ्यात माफियांची साथ देऊन महत्वाची भूमिका वठविल्याचे सांगितले जाते. मालक बाहेरगावी राहतो, अशा प्रॉपर्टी हेरुन त्याची माहिती माफियांपर्यंत पोहोचविण्याचे महत्वाचे कामच या ब्रोकर्सनी केले, हे विशेष. दुसºयाच्या भूखंडावर तिसºयालाच तब्बल सात कोटींचे कर्ज देणाºया बँका ही रक्कम आता वसूल कोठून करणार हा खरा प्रश्न आहे. जनतेने बँकांकडे विश्वासाने दिलेल्या ठेवींची बँका अशा बेजाबदारपणे विल्हेवाट लावत असल्याचा हा धक्कादायक प्रकार या निमित्ताने पुढे आला आहे. यात बँकेतील यंत्रणाही ‘मार्जीन’च्या लालसेने गुंतलेली असण्याचा संशय रियल इस्टेट क्षेत्रातून व्यक्त केला जात आहे.‘लोकमत’चे आभारगजानन धोंडगे यांनी प्रत्यक्ष येथील ‘लोकमत’ कार्यालयात येऊन लोकमत समूहाचे आभार मानले. लोकमतमुळेच आपल्याला भूखंड व्यवहारातील गैरप्रकाराची माहिती मिळाली. लोकमतचे वृत्त वाचूनच आपण आपल्या भूखंडांची खातरजमा केली आणि धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याचे धोंडगे यांनी सांगितले.