शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

बेवारस भूखंडांवर भूमाफियांची वक्रदृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 22:08 IST

शहर व परिसरातील बेवारस भूखंडांवर स्थानिक भूमाफियांनी वक्रदृष्टी फिरविली असून अनेक भूखंड गिळंकृत केले. दुय्यम निबंधक कार्यालयातून खातरजमा केल्यास अनेकांचा ‘आपणच भूखंडांचे मालक आहोत’, या भ्रमाचा भोपळा फुटण्यास वेळ लागणार नाही.

ठळक मुद्देयवतमाळकरांनो, सावधान : दुय्यम निबंधक कार्यालयातून आपल्या प्रॉपर्टीची खातरजमा करा

राजेश निस्ताने।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहर व परिसरातील बेवारस भूखंडांवर स्थानिक भूमाफियांनी वक्रदृष्टी फिरविली असून अनेक भूखंड गिळंकृत केले. दुय्यम निबंधक कार्यालयातून खातरजमा केल्यास अनेकांचा ‘आपणच भूखंडांचे मालक आहोत’, या भ्रमाचा भोपळा फुटण्यास वेळ लागणार नाही. पोलिसांनीही या टोळीच्या मुसक्या आवळणे सुरू केले आहे.बेवारस भूखंड, शेती हडपणारी टोळी यवतमाळात सक्रिय आहे. राकेश हा या टोळीचा म्होरक्या आहेत. कुणी यवतमाळात भूखंड घेऊन ठेवला असेल आणि तो मालक बाहेरगावी राहत असेल, असे प्लॉट दलालांच्या मदतीने हेरले गेले. या प्लॉटचे बनावट मालक उभे करून तर काही प्रकरणात बनावट खरेदीदारही उभे करून व्यवहार झाले. बोगस पद्धतीने खरेदी-विक्री झालेले हे भूखंड बँकांमध्ये तारण ठेऊन कोट्यवधींचे कर्ज उचलले गेले आहे. काही प्रकरणात बँका अंधारात राहिल्या तर कुठे बँकांच्या संबंधित अधिकाऱ्यांनी हातमिळवणी केली. बँका मात्र या व्यवहारात आर्थिक अडचणीत आल्या आहेत.गेल्या काही महिन्यात दोन डझनापेक्षा अधिक मोठ्या भूखंडांची अशापद्धतीने या भूमाफियांनी विल्हेवाट लावली आहे. कोट्यवधींच्या या व्यवहारात प्रॉपर्टी ब्रोकर, अर्जनवीस, दुय्यम निबंधक कार्यालय, महसूल विभाग, व्हॅल्युअर, सर्च रिपोर्ट देणारे, गुन्हेगारी टोळ्यांचे सदस्य, बँकांची यंत्रणा अशा अनेकांची साखळी आहे. या साखळीतील बहुतांश घटकांची नावे उघड झाली आहे. लवकरच या सर्वांवर गुन्हे दाखल केले जाणार आहे. फारसी खातरजमा न करता व मूळ किंमत न तपासता कोट्यवधींचे कर्ज वाटणाºया बँकांचाही यात पोलिसांकडून पर्दाफाश केला जाणार आहे. अशा बेवारस प्रॉपर्टीवर आणि या व्यवहारांवर एक अर्जनवीस सातत्याने अनेक महिन्यांपासून ‘प्रकाश’ टाकत असल्याचेही सांगितले जाते. या प्रकरणात सर्च रिपोर्ट देणारे, किंमत वाढवून देणारे ‘तज्ज्ञ’ व्हॅल्युअरसुद्धा अडचणीत येणार आहेत.विदर्भ हाऊसिंग परिसर४सुमारे दोन वर्षांपूर्वी विदर्भ हाऊसिंग भागातील पाच असेच बेवारस भूखंड परस्पर हडपले होते. या प्रकरणात वडगाव रोड ठाण्यात चार जणांना अटक करण्यात आली होती. शासकीय कर्मचारी व पोलीस बंगल्याची साफसफाई करणाºया स्वीपरच्या भावाला अटक करण्यात आली होती. बाहेरगावी राहणाºयांचे आधार कार्ड, राशन कार्ड व अन्य कागदपत्रे बनावट तयार करून हे प्लॉट विकले गेले होते. त्यातील तीन प्लॉट यातील सूत्रधाराने स्वत: ठेवले तर दोन विकले.संदीप टॉकीज परिसरबेवारस प्लॉट विक्री व्यवसायातील म्होरक्या राकेश याने संदीप टॉकीज परिसरात असाच एक कारनामा केला आहे. चार ते पाच दुकाने बँकेत गहाण ठेऊन कर्ज उचलले, तेथील यंत्रणेला हाताशी धरुन बँकेतून या संपत्तीची कागदपत्रेच गहाळ केली गेली. नंतर ही दुकाने एका नामांकित दुध विक्रेत्याला विकली. फेरफारच्या वेळी हा गैरप्रकार पुढे आला. विशेष असे या प्रॉपर्टीबाबत बँक आणि तो दूध विक्रेता यांचा वाद सुरू असताना राकेशने पुन्हा तिसºयाकडून पैसे घेतले. पैसे देण्याची तयारी दर्शविल्याने त्या दूध विक्रेत्याने पोलिसात तक्रार केली नसल्याचे सांगितले जाते. राकेशचे यवतमाळ शहरात असे अनेक कारनामे असून सध्या तो चार ते पाच कोटी रुपये घेऊन पसार असल्याचे सांगितले जाते.