शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भूदानची जमीन कागदावरच सरकारजमा

By admin | Updated: July 7, 2014 23:47 IST

यवतमाळ तालुक्यातील भूदानची २४० एकर पडिक जमीन तहसील प्रशासनाने केवळ कागदावरच सरकारजमा केली असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

यवतमाळ : यवतमाळ तालुक्यातील भूदानची २४० एकर पडिक जमीन तहसील प्रशासनाने केवळ कागदावरच सरकारजमा केली असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यवतमाळ जिल्ह्यात भूदान चळवळीत मोठ्या प्रमाणात जमीन दान दिली गेली. हीच जमीन गोरगरीब भूमिहीन नागरिकांना कसण्यासाठी दिली गेली. परंतु गेल्या कित्येक वर्षांपासून ही जमीन पडिक आहे. ‘लोकमत’ने हा प्रकार उघडकीस आणल्यानंतर यवतमाळचे तत्कालीन तहसीलदार रुपेश खंडारे यांनी या प्रकरणात कारवाई सुरू केली होती. संबंधित ताबेदार १८ शेतकऱ्यांना नोटीस बजावून आपले म्हणणे मांडण्यास सांगण्यात आले होते. त्यानंतर सुमारे २४० एकर भूदानची पडिक जमीन सरकारजमा करण्याची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली होती. एवढेच नव्हे तर या संबंधीचे आदेशही काढले गेले होते, असे सूत्रांनी सांगितले. मात्र प्रत्यक्षात ही जमीन जप्तीची कारवाई कागदावरच राहिली. प्रत्यक्षात हे आदेश तलाठी कार्यालयात पोहोचले नाही आणि या कार्यालयाने त्याबाबत विचारणाही तहसीलकडे केली नाही. सन २०१० पासून ही जमीन पडिक असल्याचा अहवाल तलाठी कार्यालयाने तहसीलदारांना दिला होता. त्यावरूनच भूदानच्या जमीन जप्तीची मोहीम सुरू करण्यात आली होती. पुढे यवतमाळ तहसील कार्यालयापर्यंत ही मोहीम मर्यादित न राहता जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने अन्य १५ तालुक्यातही राबविण्याचे निर्देश दिले गेले होते. यवतमाळ तालुक्यात मोहा, मुरझडी या गावांमध्ये भूदानची मोठ्या प्रमाणात जमीन आहे. तीन वर्षापेक्षा अधिक काळापासून ती पडिक आहे. आजही या शेतीचा ताबा संंबंधित शेतकऱ्यांच्याच नावे असून जमीन पडिकच ठेवली गेली आहे. वास्तविक ही जमीन सरकारजमा झाली असेल तर त्याचा फेरफार महाराष्ट्र शासनाच्या नावाने होणे अपेक्षित आहे. परंतु संपूर्ण कारवाईच थंडबस्त्यात असल्याचे दिसून येते. भूदानच्या पडिक जमीन जप्तीची कारवाई पुढे नेण्याचे आव्हान यवतमाळचे विद्यमान तहसीलदार अनुप खांडे यांच्या पुढे आहे. (जिल्हा प्रतिनिधी)