शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

'लाडकी बहिण'ला पुन्हा मुदतवाढ; महिला उमेदवारांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2024 14:11 IST

Yavatmal : दोन टप्प्यांत सात लाख लाभार्थीची निवड

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. यामुळे मुख्यमंत्र्यांनी या योजनेला आता ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. यामुळे या योजनेत अर्ज दाखल करणाऱ्या महिला उमेदवारांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरिता अर्ज दाखल करण्यासाठी ३१ ऑगस्ट ही अंतिम तारीख देण्यात आली होती. या योजनेत दररोज अर्ज भरणाऱ्या महिलांची संख्या वाढत आहे. यामुळे योजनेसाठी राज्य शासनाने ३१ सप्टेंबरपर्यंत मुदत दिली आहे. यामुळे ज्या महिला लाभार्थीना अजूनपर्यंत अर्ज दाखल करता आले नव्हते, अशा महिला लाभार्थीना अर्ज दाखल करता येणार आहे. 

या योजनेत आतापर्यंत पहिल्या टप्प्यात चार लाख ६७ हजार ७१३ महिलांनी आपली नोंद केली होती. यापैकी चार लाख ६३ हजार ६७१ महिलांचे अर्ज या योजनेत समाविष्ट करण्यात आले. उर्वरित अर्जाची आता छाननी केली जात आहे. 

तर दुसऱ्या टप्प्यात दोन लाख २१ हजार ३१२ अर्ज प्राप्त झाले आहेत. दोन लाख ११ हजार ३४४ अर्ज पात्र ठरले आहेत. या अर्जदारांच्या अर्जाची छाननी केली जात आहे. मुदत वाढल्याने तिसऱ्या टप्प्यात अर्ज दाखल करणाऱ्या महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. हा आकडा सात लाख लाभार्थीच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. या योजनेत पूर्वी जुने पोर्टल वापरले जात होते. आता या योजनेसाठी नवीन पोर्टल लाँच झाले आहे. त्यामुळे अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सोपी झाली आहे. यासोबतच अंगणवाडीताईंकडे अर्ज दाखल करून घेण्याच्या सूचना महिला बालकल्याण विभागाला देण्यात आल्या आहेत. यामुळे महिलांचा होणारा त्रास कमी होण्यास मदत होणार आहे. 

उत्सवातही महिलांचे लोंढे शहराकडे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत लभार्थीचे लोंढे दररोज शहराकडे वळत आहेत. सण-उत्सवांत शासकीय कार्यालयांत गर्दी कमी असते. यामुळे कामकाज लवकर होईल म्हणून शासकीय कार्यालयांत कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी महिलांनी सण-उत्सवांत गर्दी वाढवली आहे. याचा परिणाम प्रवासी वाहतुकीवरही झाला आहे. 

टॅग्स :Yavatmalयवतमाळ