शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

यवतमाळच्या नवीन बसस्थानकात विविध सुविधांचा अभाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2024 18:16 IST

Yavatmal : गाडी ठेवा बेवारस; नाश्तापाणी करा बाहेर

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : प्रवाशांकरिता बहुतांश आवश्यक सुविधा उपलब्ध झालेल्या नाही. नाश्ता-पाणी करायचे असेल तर बाहेर जावे लागते. नातेवाइकांना सोडण्यासाठी आलेल्या नागरिकांना आपले वाहन उभे करण्यासाठी जागेचेही काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे किमती वाहन बेवारस ठेवावे लागणार आहे. फलाटावर कोणती बस लागली हे माहीत करून घेण्यासाठी चौकशी कक्षाजवळ जावे लागणार आहे. याशिवाय अनेक सुविधांचा अभाव असताना यवतमाळच्या नवीन बसस्थानकाचे लोकार्पण सोमवारी केले जात आहे.

पाच वर्षांपासून हाल सहन करत असलेल्या प्रवाशांना नवीन बसस्थानकातही आखणी काही काळ त्रास सहन करावा लागेल, असे चित्र आजतरी दिसून येत आहे. २०१९ मध्ये नवीन बसस्थानकाचे काम हाती घेण्यात आले. प्रवाशांकरिता आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध झाल्यानंतरच नवीन बसस्थानक सुरू होईल, अशी अपेक्षा नागरिकांना होती. परंतु, त्याआधीच उद्घाटनाचा मुहूर्त साधला जात आहे. 

प्रवाशांना पिण्यासाठी बोअरचे पाणी आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेल्या या बसस्थानकात शुध्द आणि थंड पाण्याचीही सोय करण्यात आलेली नाही. टाक्यांमध्ये जमा केलेले पाणी नागरिकांना पिण्यासाठी वापरावे लागणार आहे. अनेक प्रवासी बाहेरगावी जाण्यासाठी सकाळीच घरून निघतात. नाश्ता करण्याची इच्छा झाल्यास त्यांना बसस्थानकाच्या बाहेर जावे लागणार आहे. बसस्थानकातील कँटीन सुरू होण्याची सध्यातरी कुठलीही चिन्हे दिसत नाही. 

बसस्थानकातून वाहन चोरीच्या घटना अधिक घडतात. अशावेळी नागरिक आपले वाहन सुरक्षित ठेवण्याची जागा शोधतात. नवीन बसस्थानकात ही व्यवस्थाही पूर्ण झालेली नाही. वाहनतळाचे अजूनही बांधकामच सुरू आहे. यासाठी आणखी काही दिवस लागणार आहेत. 

बसस्थानकाच्या इमारतीवर यवतमाळ मध्यवर्ती बसस्थानक असे नावही लिहिण्यात आलेले नाही. फलाटावरची नावे तेवढी लिहून तयार झालेली आहेत. दुकान गाळे सुरू होण्यास प्रतीक्षा करावी लागणार आहे. तोपर्यंत वस्तू खरेदीसाठी बाहेरचा रस्ता धरावा लागणार आहे. मंगळवारपासून नवीन बसस्थानकावरून प्रवासी वाहतूक सुरू होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. परंतु, काही बाबतीत प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे. 

११ महिन्यांत करायचे होते काम यवतमाळ येथील नवीन बसस्थानकाच्या कामाला २०१९ मध्ये सुरुवात करण्यात आली. ११ महिन्यांत हे काम पूर्ण करायचे होते. प्रत्यक्षात पाच वर्षाचा कालावधी लागला. कोरोना, न्यायालयीन प्रक्रिया आदी कारणांमुळे बांधकामाला विलंब झाल्याचे महामंडळाच्या सूत्रांनी सांगितले. १७ फलाटांवर बसेस लागतील, अशी माहिती देण्यात आली. 

टॅग्स :Yavatmalयवतमाळ