शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम अभियंत्याच्या खुर्चीला हारार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 23:15 IST

शहरातील अतिक्रमण काढण्याची चुकीची पद्धत आणि एका इसमास धक्काबुक्की करून जेसीबीवर लोटल्याप्रकरणी बांधकाम उपअभियंत्यावर कारवाईची मागणी करण्यात आली. संतप्त झालेल्या अतिक्रमणधारकांनी सार्वजनिक बांधकाम विभाग अभियंत्याच्या खुर्चीला हारार्पण करून निवेदन चिटकविले.

ठळक मुद्देनिवेदन चिटकविले : नेर येथील अतिक्रमणधारकांचा संताप

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : शहरातील अतिक्रमण काढण्याची चुकीची पद्धत आणि एका इसमास धक्काबुक्की करून जेसीबीवर लोटल्याप्रकरणी बांधकाम उपअभियंत्यावर कारवाईची मागणी करण्यात आली. संतप्त झालेल्या अतिक्रमणधारकांनी सार्वजनिक बांधकाम विभाग अभियंत्याच्या खुर्चीला हारार्पण करून निवेदन चिटकविले.सार्वजनिक बांधकाम विभागाने शहरात १६ मे रोजी अतिक्रमण हटाव मोहीम राबविली. रस्त्याच्या मध्यभागापासून १२ मीटरची आखणी चुण्याने करण्यात आली. अनेकांची दुकाने आखणी झालेल्या जागेपासून बाहेर असल्याने त्यांनी अतिक्रमण काढले नाही. नंतर मात्र सरसकट अतिक्रमणावर बुलडोजर चालविण्यात आला. दुसरीकडे काही दुकानांसमोर दोन तासपर्यंत बुलडोजर थांबवून त्यांना अतिक्रमण काढण्याची संधी देण्यात आली, तर काही लोकांना पाच दिवसांचा अवधी देण्यात आला.मोहीम राबविताना झालेला दुजाभाव, अतिक्रमण काढण्याची नियमबाह्य पद्धत याविषयी रोष व्यक्त करत येथील अतिक्रमणग्रस्त सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर धडकले. याठिकाणी उपअभियंता भूपेश कथलकर उपस्थित नव्हते. त्यांच्या खुर्चीला हार अर्पण करून आपला राग व्यक्त करण्यात आला. यानंतर ते पोलीस ठाण्यावर धडकले. उपअभियंता भूपेश कथलकर, एस.डी. माही, कलंत्री यांच्याविरूद्ध तक्रार नोंदविली. जगदीश शंकर डवरे यांचे वडील शंकर डवरे यांच्या झेरॉक्स सेंटरचे नुकसान करण्यात आले. जगदीश डवरे यांनी तक्रार नोंदविली. सदर अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी, लीज पट्ट्यावर दुकान मिळावे या मागणीसाठी २५ मे रोजी बेमुदत उपोषण केले जाणार आहे. यावेळी नगरसेवक सुनील खाडे, इरफान आकबानी, आशीष खोडे, प्रशांत वंजारी, विष्णू तवकार, अ‍ॅड. सलीम शाह, सुनील वानखडे, मधुकर इंगोले आदी उपस्थित होते.

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभाग