शहरं
Join us  
Trending Stories
1
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
2
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
3
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
4
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
5
"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला?
6
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
7
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते
8
...तर गुप्ता, सुपेकरांची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध
10
मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच
11
लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
12
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के कौशल्याधारित शिक्षण, युजीसीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना; विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत होणार वाढ
13
यूपीपाठोपाठ दिल्लीत एन्काउंटरमध्ये वाढ, जूनच्या पहिल्या पाच दिवसांत पाच एन्काउंटर
14
नेपाळच्या ७ हजार लोकांना अमेरिका सोडावी लागणार, अमेरिकेने विशेष देशाचा दर्जा काढून घेतला
15
अंध वकिलाकडून सुप्रीम कोर्टात प्रथमच युक्तिवाद, भारतीय न्यायव्यवस्थेत ऐतिहासिक क्षण
16
जळक्या नोटा : न्या. वर्मांपुढे आता राजीनाम्याचाच पर्याय
17
मणिपूर पेटले, निदर्शकांनी अंगावर घेतले पेट्रोल ओतून
18
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
19
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
20
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  

पुसद उपवनसंरक्षकांच्या बंगल्यावर राबताहेत मजूर

By admin | Updated: August 9, 2015 00:09 IST

वनमजुरांना वनेत्तर कामात गुंतवू नये असे शासनाचे स्पष्ट आदेश असतानाही वन अधिकाऱ्यांच्या शासकीय बंगल्यावर वन मजुरांना राबविले जात असल्याचा...

पुसद : वनमजुरांना वनेत्तर कामात गुंतवू नये असे शासनाचे स्पष्ट आदेश असतानाही वन अधिकाऱ्यांच्या शासकीय बंगल्यावर वन मजुरांना राबविले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथील उपवनसंरक्षकांच्या बंगल्यात राबणाऱ्या मजुरांना ‘लोकमत’च्या कॅमेराने टिपले. अखिल भारतीय वन सेवेच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात सुमारे एकर भराचा बंगला असतो. या बंगल्याच्या देखभाल, साफसफाई व घरगुती कामांसाठी वन मजूर वापरण्याचा प्रघात वन खात्यात पडला आहे. वन मजुराने जंगलात काम करणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात अनेकांना साहेबांच्या बंगल्यावरच राबावे लागते. आधीच वन कर्मचारी अपुरे असताना उपलब्ध कर्मचाऱ्यांना जंगल संरक्षण सोडून बंगल्यावर, वन कार्यालयात लिपीकवर्गीय कामासाठी वापरले जात असल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आली. म्हणून शासनाने वन मजुराचा वनेत्तर कामासाठी वापर करण्यास मनाई करणारा आदेश जारी केला. त्यानंतर आयएफएसच्या बंगल्यातून या मजुरांना बाहेर काढून जंगलात पाठविण्यात आले. परंतु आता पुन्हा मजूर बंगल्यात वापरण्याचे प्रकार सुरू झाले आहे. पुसद येथील उपवनसंरक्षकांच्या बंगल्यात झाडपूस करताना मजुरांना शनिवारी ८ आॅगस्ट रोजी दुपारी टिपण्यात आले. या बंगल्यात नामदेव, गजानन व भाऊ हे तीन वनमजूर कार्यरत आहेत. त्यांना दिवसभर बंगल्यावरच ड्युटी द्यावी लागते. झाडपूसपासून सर्वच कामे करावी लागतात. वारंवार मागणी करूनही त्यांना पुसद वन क्षेत्रात प्रत्यक्ष जंगल संरक्षणाची ड्युटी दिली गेलेली नाही. पुसद डीएफओ बंगल्यातील हा प्रकार कॅमेरात कैद झाला. असाच प्रकार अन्य आयएफएस, एसीएफ, आरएफओ दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बंगल्यावर असण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्यातील दोन उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या बंगल्यांमध्ये रोपवाटिका आहेत. त्याच्या देखभालीसाठी वनमजूर लागतात. याच वन मजुरांना रोपवाटिकेआड बंगल्यातील अन्य कामांसाठी वापरले जात असल्याची माहिती आहे. विशेष असे वन मजूर बंगल्यावर वापरले जात असल्याबाबत विधिमंडळात तारांकित प्रश्न उपस्थित केला गेला होता. त्यावेळी बंगल्यावर एकही वनमजूर कामावर नाही, सर्वांना प्रत्यक्ष जंगल संरक्षणाच्या कामात नेमले गेले, अशी शासनाला सादर केली गेली होती, हे विशेष. मात्र प्रत्यक्षात वन मजूर अद्यापही राबत असल्याचे पुसद डीएफओच्या बंगल्यात सिद्ध झाले आहे. डीएफओ सारखा जबाबदार अधिकारी शासनाचे आदेश डावलून आपल्या बंगल्यात वन मजुरांना राबवीत असल्याचे पाहून त्यांच्या अधिनस्त काही एसीएफ, आरएफओंकडूनही या प्रकाराची पुनरावृत्ती केली जात असल्याचे सांगितले जाते. डीएफओ १२ आॅगस्टपर्यंत प्रशिक्षणाला गेले आहेत. त्यानंतरही वनमजूर बंगल्यावर कायम आहेत.