शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
3
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
4
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
5
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
6
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
7
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
8
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
9
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
10
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
11
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
12
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
13
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
14
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
15
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
16
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
17
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
18
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
19
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
20
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली

एसटीत कोविडचे नियम पायदळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2020 05:00 IST

२६ मे रोजी विभाग नियंत्रकांनी कामगार संघटनेची बैठक बोलाविली होती. वास्तविक विभाग नियंत्रकांचे कक्ष बैठक घेण्याऐवढे विस्तीर्ण नाही. यानंतरही त्यांनी विभाग नियंत्रकांसह सात अधिकारी आणि कामगार संघटनेचे प्रतिनिधी अशा १७ जणांची बैठक घेतली. कमीत कमी कर्मचाºयांमध्ये कामकाज चालवावे, असे आदेश असताना विभागीय कार्यालयामध्ये १०० टक्के उपस्थिती ठेवली जाते.

ठळक मुद्देकर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह : १०० टक्के उपस्थितीत काम, रोष व्यक्त करत केले होते काम बंद

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या यवतमाळ विभागात ‘कोविड-१९’चे नियम अधिकारी ते कर्मचाऱ्यांकडून पायदळी तुडविले जात आहे. विशेष म्हणजे, या कार्यालयाचे काही कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहे. कामगार संघटनांची बैठक घेण्यापासून ते १०० टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती ठेवण्यापर्यंत या कार्यालयाने नियम पायदळी तुडविण्याचा प्रताप केलाआहे.लोकांनी गर्दी करू नये, यासाठी सोशल डिस्टन्सिंग, मास्क लावून राहणे, सॅनिटायझरचा वापर, साबणाने हात स्वच्छ धुणे आदी नियम घालून देण्यात आले आहे. यातील काही बाबी कर्मचारी वैयक्तिकरित्या पाळत असल्या तरी बैठका, ठरवून दिलेल्या मर्यादेत हजेरीचे नियम पाळले जात नाही. कोरोनाचा प्रकोप वाढत चाललेला असतानाही महामंडळाच्या विभागीय कार्यालयाला जाग कशी येत नाही, हा प्रश्न याठिकाणी उपस्थित केला जात आहे.२६ मे रोजी विभाग नियंत्रकांनी कामगार संघटनेची बैठक बोलाविली होती. वास्तविक विभाग नियंत्रकांचे कक्ष बैठक घेण्याऐवढे विस्तीर्ण नाही. यानंतरही त्यांनी विभाग नियंत्रकांसह सात अधिकारी आणि कामगार संघटनेचे प्रतिनिधी अशा १७ जणांची बैठक घेतली. कमीत कमी कर्मचाºयांमध्ये कामकाज चालवावे, असे आदेश असताना विभागीय कार्यालयामध्ये १०० टक्के उपस्थिती ठेवली जाते. या प्रकारात साथरोग अधिनियमाचा भंग झाला. याप्रकरणी विभाग नियंत्रकांवर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे प्रादेशिक सचिव अरुण गाडगे यांनी जिल्हाधिकाºयांकडे केली होती. त्यावर कारवाई झाली नाही. त्यामुळे सोमवार, ७ सप्टेंबर रोजी पुन्हा गाडगे यांनी तक्रार देवून विभाग नियंत्रकांवर गुन्हा नोंदविण्याची मागणी केली आहे. विभागीय कार्यालयात कोरोनाचा पहिला पॉझिटिव्ह आल्यानंतर कर्मचाºयांनी बाहेर निघून रोष व्यक्त केला होता.नियमापेक्षा अधिक प्रवासी घेवून वाहतूकएसटी बसद्वारे ‘कोविड-१९’चे नियम तोडून प्रवासी वाहतूक केली जात आहे. या प्रकारात कोरोनाचा प्रसार वाढण्याची भीती खुद्द महामंडळ कर्मचाºयांकडून व्यक्त केली जात आहे. शिवाय स्वत:च्या सुरक्षिततेविषयीसुद्धा त्यांच्याकडून चिंता व्यक्त केली जात आहे. आंतरजिल्हा प्रवासी वाहतूक सुरू झाल्यापासून काही मार्गावर ३५ ते ४० प्रवासी घेवून एसटी बसेस धावत आहे. २२ पेक्षा अधिक प्रवासी घेऊ नये, ज्येष्ष्ठ नागरिक , बालकांची वाहतूक करण्यात येवू नये आदी नियम ‘कोविड-१९’ अंतर्गत घालून देण्यात आले आहेत. यानंतरही यवतमाळ आगारातून सुटणाऱ्या बसेसमधून नियम तोडून प्रवासी वाहतूक होत आहे. बसस्थानकावर एसटी बसेसमध्ये प्रवासी भरणाºया कर्मचाºयांकडूनच जादा प्रवासी घेण्याची सक्ती केली जात असल्याची ओरड कर्मचाºयांमधून होत आहे. ठरवून दिलेल्या संख्येनुसारच प्रवासी वाहतूक करावी, अशी मागणी प्रवाशांकडूनही होत आहे. यासंदर्भात यवतमाळ आगार व्यवस्थापक रमेश उईके यांना विचारले असता, नियमानुसारच प्रवासी वाहतूक केली जात आहे. गर्दी वाढलेल्या मार्गावर अधिक बसेस सोडण्यात येते. कदाचित एखाद्यावेळी प्रवाशाच्या विनंतीवरून जादा वाहतूक झाली असू शकते. मात्र आवश्यक ती खबरदारी घेतली जात असल्याचे ते म्हणाले.