महागावातील कोविड केंद्र समस्यांग्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2020 05:00 AM2020-06-06T05:00:00+5:302020-06-06T05:00:16+5:30

या केंद्रात रुग्णांची सेवा करणे आरोग्य विभागाचे कर्तव्य आहे. मात्र केंद्रातील नागरिकांना ‘कोरोनाग्रस्तांनी असा कोणता तीर मारला, की आम्ही त्यांची सेवा करावी, जे मिळते त्यात समाधान माना, स्वत: आत्मनिर्भर राहा, असा सल्ला आरोग्य यंत्रणा देत आहे. त्यामुळे रुग्णांच्या उपचाराची काय स्थिती असेल, याची कल्पना न केलेलीच बरी. या केंद्रात पिण्याच्या पाण्याच्या व शौचालयातही पाण्याचा अभाव आहे.

Kovid center in Mahagaon is in trouble | महागावातील कोविड केंद्र समस्यांग्रस्त

महागावातील कोविड केंद्र समस्यांग्रस्त

Next
ठळक मुद्देअनेक असुविधा : जेवणाचा दर्जा सुमार, क्वारंटाईन नागरिक त्रस्त, समाधान मानण्याचा सल्ला

ज्ञानेश्वर ठाकरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
महागाव : येथील शासकीय निवासी विद्यालयात कोविड केंद्राची निर्मिती करण्यात आली. तेथे सध्या अनेक नागरिक क्वारंटाईन आहे. मात्र हे केंद्र समस्यांच्या विळख्यात सापडले असून क्वारंटाईन नागरिक त्रस्त आहे.
या केंद्रात रुग्णांची सेवा करणे आरोग्य विभागाचे कर्तव्य आहे. मात्र केंद्रातील नागरिकांना ‘कोरोनाग्रस्तांनी असा कोणता तीर मारला, की आम्ही त्यांची सेवा करावी, जे मिळते त्यात समाधान माना, स्वत: आत्मनिर्भर राहा, असा सल्ला आरोग्य यंत्रणा देत आहे. त्यामुळे रुग्णांच्या उपचाराची काय स्थिती असेल, याची कल्पना न केलेलीच बरी. या केंद्रात पिण्याच्या पाण्याच्या व शौचालयातही पाण्याचा अभाव आहे. केंद्रात दाखल रुग्णांची कोणतीच सोय होत नसल्याची ओरड काहींनी केली.
कोरोनाने मृत्यू येईल तेव्हा येईल, परंतु अवेळी भोजन, पिण्याच्या पाण्यासह वापरण्याचे पाणी नसल्याने आम्ही या समस्येमुळे मरू शकतो, अशी भीती तेथील क्वारंटाईन नागरिकांनी व्यक्त केली. या केंद्रात रात्रीचे जेवण ११ वाजता मिळाले. त्यातही जेवणाचा दर्जा सुमार होता. दुसऱ्या दिवशी चहा मिळाला नाही. सकाळचे जेवण चक्क दुपारी ३ वाजता मिळाले. वापरण्याच्या पाण्याचा अभाव आहे. अशा विविध समस्येत क्वारंटाईन वावरत आहे. ‘लोकमत’ने ही बाब संबंधित अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली. त्यामुळे मात्र गुरुवारी त्यांना रात्रीचे जेवण वेळेत मिळाले.

कोविड सेंटरमधील नागरिकांना जेवण देण्यास कुणीही तयार नाही. ज्यांना जेवणाचे डबे द्यावयाचे आहे, त्यांच्या शोधात आम्ही आहोत. त्यांच्याशी करार करून व्यवस्था करण्याचा प्रयत्न आहे. वाढते रुग्ण बघता थोड्याफार समस्या उद्भवणारच आहेत.
- नीलेश मडके,
तहसीलदार महागाव

Web Title: Kovid center in Mahagaon is in trouble

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.