शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

कोठारीच्या ‘आदर्श’ परीक्षा केंद्रावर कॉप्यांचा सुळसुळाट,  शाळा परिसराला आले जत्रेचे स्वरूप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2018 15:47 IST

विविध पथकांची स्थापना करून शिक्षण विभाग संपूर्ण जिल्ह्यात कॉपीमुक्त परीक्षा सुरू असल्याचा दावा करीत आहे. मात्र महागाव तालुक्यातील कोठारी येथील आदर्श विद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर दहावीच्या परीक्षेत कॉप्यांचा सुळसुळाट झाला आहे.

- सदानंद लाहेवार

बिजोरा (यवतमाळ) : विविध पथकांची स्थापना करून शिक्षण विभाग संपूर्ण जिल्ह्यात कॉपीमुक्त परीक्षा सुरू असल्याचा दावा करीत आहे. मात्र महागाव तालुक्यातील कोठारी येथील आदर्श विद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर दहावीच्या परीक्षेत कॉप्यांचा सुळसुळाट झाला आहे. मराठीच्या पहिल्याच पेपरला विद्यार्थ्यांना कॉप्या पुरविण्यासाठी नातेवाईकांनी एकच गर्दी केली. त्यामुळे शाळा परिसराला जत्रेचे स्वरूप आले आहे. महागाव तालुक्यातील कोठारी येथील आदर्श विद्यालयात दहावीचे परीक्षा केंद्र आहे. गुरुवारी दहावीचा मराठीचा पहिला पेपर होता. या परीक्षा केंद्रावर २४० विद्यार्थी परीक्षा देत आहे. या ठिकाणी केंद्र प्रमुख, उपकेंद्र प्रमुख, बैठे पथक, पर्यवेक्षक आदींची नियुक्ती करण्यात आली आहे. कॉपीमुक्त अभियानाची जय्यत तयारी केली असतानाच मराठीच्या पहिल्याच पेपरला कॉपीबहाद्दरांनी चांगलाच गोंधळ घातला. शाळा परिसरात खुलेआम प्रवेश करून थेट वर्गात शिरून विद्यार्थ्यांना कॉपी दिली जात आहे. पालकांसोबत काही शिक्षकही मर्जीतील विद्यार्थ्यांना सहकार्य करीत असल्याचे दिसून आले. आत प्रवेश न मिळालेले नातेवाईक खिडक्यांमधून आपल्या पाल्यांपर्यंत कॉपी पुरवत आहे. वर्गामध्ये असलेले पर्यवेक्षकही या प्रकाराला मज्जाव करीत नाही. विशेष म्हणजे गत १५ वर्षांपासून येथे दहावीचे परीक्षा केंद्र आहे. अनेक विद्यार्थी हमखास पास होता येते म्हणून या ठिकाणी प्रवेश घेतात. तालुक्यातीलच नव्हेतर जिल्ह्यातील विद्यार्थी देणगी देवून या शाळेत प्रवेश घेवून पास होतात. या सर्व प्रकारात हुशार विद्यार्थ्यांचे मात्र नुकसान होत आहे. शिक्षण विभागही याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते.

टॅग्स :Yavatmalयवतमाळexamपरीक्षा