शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ जिल्ह्यात दूषित पाण्यामुळे गावेच्या गावे झाली किडनीरुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 11:02 IST

फ्लोराईडयुक्त पाण्यामुळे शंभराहून अधिक बळी गेलेले असताना यंदा तीव्र टंचाईत भूगर्भातील दूषित पाणी पिल्याने गावेच्या गावे किडनी रुग्ण बनले आहेत.

ठळक मुद्देकिडनी आजाराचे थैमान रोज ५० रुग्णांची डायलिसिससाठी अमरावतीकडे धाव

अविनाश साबापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : नापिकी, फवारणीतील विषबाधा या कारणांनी यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मरण गाजले. आता याच जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर पाणी पिल्याने मरत आहेत. फ्लोराईडयुक्त पाण्यामुळे शंभराहून अधिक बळी गेलेले असताना यंदा तीव्र टंचाईत भूगर्भातील दूषित पाणी पिल्याने गावेच्या गावे किडनी रुग्ण बनले आहेत. येथून दररोज ५० रुग्ण केवळ डायलिसीससाठी अमरावतीला जात आहेत. तर तेवढेच रुग्ण तपासणीसाठी धाव घेत आहेत.जिल्ह्यातील ४५२ गावांमधील पाण्याचे स्त्रोत फ्लोराईडयुक्त असल्याची शासकीय आकडेवारी आहे. प्रत्यक्षात हजारो गावे दूषित पाणी पिउन जगत आहेत आणि हळूहळू किडनी खराब होऊन मरणाकडे वाटचाल करीत आहेत. एकेका कुटुंबात किडनीचे तीन-तीन रुग्ण आढळत आहेत. उन्हाळ्याचा कडाका वाढत असताना फ्लोराईडयुक्त पाण्याची समस्या गंभीर बनली आहे. जमिनीच्या पोटात खोल-खोल विंधनविहिरी खोदून पाणी उपसले जात आहे. जेवढ्या खोलातून पाणी काढले, ते तेवढेच जास्त दूषित. त्यातूनच यवतमाळसह घाटंजी, पांढरकवडा, झरीजामणी, उमरखेड, दिग्रस, नेर, दारव्हा या तालुक्यांमधील खेड्यांत सध्या किडनीच्या रुग्णांचे प्रमाण दरदिवशी वाढत आहे. वसंतनगर, चोपण, मारेगाव, खैरगाव, आंबेझरी, आमडी, जरंग, साखरा, मुरली आदी खेड्यांमध्ये गंभीर स्थिती आहे. आसोला गावात तर किडनीच्या आजाराने १४ जणांचा मृत्यू झाला आहे. मुरली गावात गेल्या दहा वर्षात ५० जण दगावल्याचे सांगितले जाते.

बंदी असलेली गोळी किराणा दुकानातदूषित पाण्याने किडनीचे रुग्ण वाढत असताना यवतमाळात डायलिसीसची सुविधाच नाही. ग्रामीण भागातील शेतकरी आणि शेतमजूरच दूषित पाण्याचे बळी ठरत आहेत. त्यामुळे शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीने नुकतेच अमरावती येथील किडनी विकार तज्ज्ञ डॉ. अविनाश चौधरी यांचे शिबिर आसोला गावात घेतले. त्यावेळी डॉ. चौधरी म्हणाले, माझ्या ओपीडीमध्ये दररोज यवतमाळ जिल्ह्यातून रुग्ण येत आहेत.५० जण तर डायलिसीससाठीच येत आहेत. रोज बोलेरो गाडी भरून रुग्ण येत आहेत. विशेष म्हणजे, शेतमजूर चक्क किरणा दुकानातून पेन किलर म्हणून निमोसुलाईड गोळी घेऊन खाताना आढळले. ही गोळी किडनीवर मारा करते. बंदी असलेली ही गोळी किराणा दुकानातून कशी मिळते, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

‘नीरी’ने तपासावे पाणीज्या भागातील पाणीस्त्रोतांमध्ये फ्लोराईडचे प्रमाण जास्त आहे तेथील पाण्याची तपासणी वर्षातून किमान दोन वेळा व्हायला पाहिजे. शेकडो खेड्यातील पाण्यात कॅल्शियम, मॅग्नेशियम, स्टोरियम, आयरन, कार्बोनेट, सल्फेट यांचे प्रमाण जास्त आढळते. अशा ‘हार्ड वॉटर’ची तपासणी ‘नीरी’सारख्या संस्थेमार्फत होणे आवश्यक आहे. अधिक क्षारयुक्त पाणी हे किडनी आजाराचे मूळ कारण आहे. तणनाशकातील ग्लायफासेट हे रसायन थेट जमिनीत जाऊन नंतर पाणी व खाद्यस्त्रोतांमध्ये मिसळले जातात. त्यामुळेही या आजाराची शक्यता वाढते. वारंवार लघवी येणे, कंबर दुखणे, मीठ खावेसे वाटणे ही या आजाराची प्राथमिक लक्षणे आहेत.

टॅग्स :Healthआरोग्य