शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अंथरुणाला खिळलेल्या वनपालाची केली जिल्हा बदली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2022 05:00 IST

आजारी असल्याने चालताही येत नसल्याचे उपवनसंरक्षक यांना सांगितले. मात्र त्यांनी  दया दाखविली नसल्याचे सांगत,  महाराष्ट्र नागरी सेवा नियम (रजा) १९८१ नियम ७९ परिशिष्ट ३ नियम १ ते १० मधील तरतुदीनुसार अर्धांगवायू झालेल्या रुग्णाला लागू होतो. मात्र यानुसारही आपल्याला लाभ देण्यात आला नसल्याचे ते म्हणाले.. मे २०१९ पासून आजतागायत  कोणतीही रजा मंजूर केली नाही. यामुळे  वेतन, वैद्यकीय खर्चसुद्धा मिळालेला नाही.  

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ :  अर्धांगवायू झाल्याने अंथरुणाला खिळलेल्या वनपालाची थेट जिल्ह्याबाहेर वाशिम येथे बदली केली. इतकेच नव्हे तर त्यांना पुसद येथून तत्काळ कार्यमुक्तही करण्यात आले. या   कारभारामुळे उपासमार होत असून, वनविभागाची यंत्रणा विनाकारण त्रास देत असल्याची खंत कर्मचारी रमेश सुरोशे यांनी व्यक्त केली आहे. पुसद तालुक्यातील शेंबाळपिंपरी वनपरिक्षेत्रात तपासणी नाक्यावर कार्यरत असताना सुरोशे यांना ९ मे २०१९ रोजी कर्तव्यावर असतानाच अर्धांगवायूचा झटका आला. यातून ते अजूनही सावरलेले नाहीत. त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहे. अंथरुणावर असतानाच कुठलीही पूर्वकल्पना न देता सामाजिक वनीकरण वाशिम येथे त्यांची विभाग बदली करण्यात आली. आश्चर्याची बाब म्हणजे त्यांना उपवनसंरक्षक यांनी तत्काळ कार्यमुक्तही केले. आजारी असल्याने चालताही येत नसल्याचे उपवनसंरक्षक यांना सांगितले. मात्र त्यांनी  दया दाखविली नसल्याचे सांगत,  महाराष्ट्र नागरी सेवा नियम (रजा) १९८१ नियम ७९ परिशिष्ट ३ नियम १ ते १० मधील तरतुदीनुसार अर्धांगवायू झालेल्या रुग्णाला लागू होतो. मात्र यानुसारही आपल्याला लाभ देण्यात आला नसल्याचे ते म्हणाले.. मे २०१९ पासून आजतागायत  कोणतीही रजा मंजूर केली नाही. यामुळे  वेतन, वैद्यकीय खर्चसुद्धा मिळालेला नाही.   जगण्याचा मूलभूत अधिकारच बाधित केला आहे. या अन्यायाविरोधात राज्याच्या लोकायुक्त, वनविभागाचे प्रधान सचिव, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक नागपूर यांच्याकडे तक्रार केली असून, त्यांच्याकडून न्याय मिळेल अशी अपेक्षा असल्याचे सुरोशे यांनी सांगितले.   

रुग्णालयात असताना सक्तीची कार्यमुक्ती का?- सोईच्या कर्मचाऱ्याची बदली झाल्यानंतरही वरिष्ठ त्याला कार्यमुक्त करीत नाही. रमेश सुरोशे यांच्या प्रकरणात ते रुग्णालयात भरती असतानाही त्यांना परस्पर कार्यमुक्त केले. येथे वरिष्ठांनी सहानुभूती दाखविलेली नाही. त्यांना अडचणीच्या काळात मदत सोडा, हक्काचे वेतनही दिलेले नसल्याचे सुराेशे यांनी सांगितले. वनपाल पदावर  एकच पदावधी झालेला असताना विभागाबाहेर केलेली बदलीही निमयबाह्य असल्याचे सुरोशे यांचे म्हणणे आहे.

 शेंबाळपिंपरी वन नाक्यावर असलेले वनपाल रमेश सुरोशे यांची २०१९ मध्ये बदली झाली. मुख्य वनसंरक्षकांच्या आदेशावरुनच त्यांना कार्यमुक्त करण्यात आले होते. या प्रकरणात यापेक्षा जास्त माहिती नाही. - सचिन सावंत, वनपरिक्षेत्र अधिकारी

 

टॅग्स :forest departmentवनविभाग