शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

सणासुदीत शांतता राखा

By admin | Updated: August 14, 2016 01:08 IST

आगामी काळात होऊ घातलेला पोळा, गणेशोत्सव, दुर्गोत्सव, दसरा आदी सणासुदीत कायदा व सुव्यवस्था अबाधित शांतता राखा, ...

पोलीस महानिरीक्षक : उमरखेड, पुसदमध्ये शांतता समितीची सभा उमरखेड/पुसद : आगामी काळात होऊ घातलेला पोळा, गणेशोत्सव, दुर्गोत्सव, दसरा आदी सणासुदीत कायदा व सुव्यवस्था अबाधित शांतता राखा, असे आवाहन विशेष पोलीस महानिरीक्षक (अमरावती परिक्षेत्र) विठ्ठलराव जाधव यांनी केले. शनिवारी उमरखेड आणि पुसद पोलीस ठाण्यात झालेल्या शांतता समितीच्या बैठकींमध्ये त्यांनी मार्गदर्शन केले. उमरखेड येथे बोलताना पोलीस महानिरीक्षक यांनी दोन वर्षापूर्वी गणेशोत्सवादरम्यान झालेल्या प्रकाराची गंभीर दखल घेत यंदा शांतता ठेवण्याची सूचना केली. कायदा व सुव्यवस्था बिघडविणाऱ्यांची गय केली जाणार नाही, अशी तंबीही त्यांनी दिली. बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह, अपर पोलीस अधीक्षक डॉ. काकासाहेब डोळे, प्रभारी डिवायएसपी सदानंद मानकर, उमरखेडचे ठाणेदार अनिल पाटील, बिटरगावचे ठाणेदार सूरज बोंडे, पुसद शहरचे ठाणेदार गजानन शेळके, पुसद ग्रामीणचे ठाणेदार धनंजय जगदाळे उपस्थित होते. उमरखेड आणि पुसद येथे झालेल्या बैठकांमध्ये नागरिकांकडून आलेल्या सूचनांचे पोलीस महानिरीक्षक आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांनी स्वागत केले. उमरखेड येथील शांतता समितीच्या बैठकीत माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर, माजी आमदार विजय खडसे, इनायतउल्ला जनाब, नंदकिशोर अग्रवाल, माजी नगराध्यक्ष राजू जयस्वाल, नारायण भट्टड, मौलाना अख्तर नदवी, प्रशांत पतेवार, अ‍ॅड. संजय जाधव, साजीद जागिरदार, बळवंतराव नाईक, संजय भंडारे, महेश काळेश्वरकर, एजाज जनाब, सतीश नाईक, नितीन भुतडा, शिवाजी वानखेडे, शिवाजी माने, रमेश चव्हाण, प्रकाश आर्य, डॉ. अनिल काळबांडे, सदाशिव भेंडीकर, पांडुरंग शिंदे, लक्ष्मीबाई मलकुलवार उपस्थित होते. (लोकमत चमू) उमरखेड ठाणेदारांना अल्टीमेटम उमरखेड शहरात चालू असलेल्या अवैध धंद्यांवर तत्काळ पायबंद घालावा. तसेच नागरिकांनी बैठकीत कायदा आणि सुव्यवस्थेसाठी मांडलेल्या समस्यांची दखल घेऊन तत्काळ निपटारा करा, असे निर्देश पोलीस महानिरीक्षकांनी उमरखेडचे ठाणेदार अनिल पाटील यांना दिले. या समस्या सोडविण्यासाठी काही दिवसांचा अल्टीमेटम दिला. पोलिसांचा सामान्यांशी संपर्क नाही पुसदमध्ये शांतता समितीच्या बैठकीला अत्यल्प उपस्थिती राहते याचे कारण म्हणजे पोलिसांचा सर्वसामान्यांशी संपर्क नाही, असे गाऱ्हाणे नागरिकांनी मांडले. पूर्वी शांतता समितीच्या बैठकीला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहात होते. मात्र आता पोलीसच सामान्यांना जवळ करीत नसल्याने नागरिकांनी बैठकीकडे पाठ फिरविली आहे.