लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : विश्वविख्यात क्रांतिकारी राष्ट्रसंत मुनीश्री तरुणसागरजी महाराज यांचे यवतमाळातील प्रवचन ऐतिहासिक ठरले. तसेच या प्रवचनाने अनेकांचे आयुष्यच बदलून गेले. प्रभावी वाणीने आणि दैनंदिन जीवनातील दाखले देत महाराजांनी यवतमाळकरांना सन्मार्ग दाखविला होता. ‘कडवे वचन’ ऐकून अनेकांनी व्यसने, मांसाहार त्यागला.रोज २० हजारांची गर्दीयेथील दर्डा उद्यान मार्गावर ‘संस्कार यज्ञ’ या ठिकाणी महाराजांचे प्रवचन ऐकण्यासाठी दररोज गर्दी ओसंडत होती. प्रवचनासाठी ६०० फुटांचा मंच उभारण्यात आला होता. महाराजांचे सिंहासन साकारण्यात आले होते. तर त्यांच्या आसनव्यवस्थेसाठी मोठी नावही तयार करण्यात आली होती. रोज साधारण १५ ते २० हजार लोक ‘कडवे वचन’ ऐकण्यासाठी येत होते. या गर्दीने प्रचंड मोठा असलेला मंडपही भरून जायचा आणि मंडपाबाहेरील संपूर्ण रस्ताही भरून जायचा. मात्र, रोज एवढी गर्दी होऊनही संपूर्ण प्रवचनमाला अत्यंत शिस्तबद्ध, नियोजनबद्ध पार पडली. त्यामागे आयोजन समितीची मेहनत होती. बाहेरगावातून येणाऱ्या हजारो भाविकांसाठी आयोजन समितीने विशेष बसेसची व्यवस्था केली होती. त्यासाठी ठिकठिकाणी ‘पॉर्इंट’ देण्यात आले होते. तर दर्डा मातोश्री सभागृहात सर्वांसाठी जेवणाची, पाण्याची व्यवस्था ठेवण्यात आली होती. तसेच बसस्थानक किंवा शहरातील कोणत्याही भागातून प्रवचनस्थळी येणाºयांसाठी आॅटो युनियनने मोफत सेवा दिली होती.अनेकांनी सोडला मांसाहारसकाळी ९ वाजता मुनिश्री तरुणसागरजी महाराजांचे प्रवचन सुरू व्हायचे. पण हजारो लोक पहाटेपासूनच ‘जागा पकडण्यासाठी’ येऊन बसायचे. तरुणसागरजी महाराजांची वाणी अत्यंत प्रभावी होती. त्यामुळेच ‘कडवे वचन’ ऐकण्यासाठी स्वयंस्फूर्तीने गर्दी व्हायची. यवतमाळातील एप्रिल २००९ मधील त्यांची प्रवचनमाला ऐकून अनेकांनी कायमचा मांसाहार सोडला. प्रवचनस्थळीच त्यांनी शाकाहाराची शपथ घेतली.
‘कडवे वचन’ने केले मनपरिवर्तन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 23:26 IST
लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : विश्वविख्यात क्रांतिकारी राष्ट्रसंत मुनीश्री तरुणसागरजी महाराज यांचे यवतमाळातील प्रवचन ऐतिहासिक ठरले. तसेच या प्रवचनाने अनेकांचे आयुष्यच बदलून गेले. प्रभावी वाणीने आणि दैनंदिन जीवनातील दाखले देत महाराजांनी यवतमाळकरांना सन्मार्ग दाखविला होता. ‘कडवे वचन’ ऐकून अनेकांनी व्यसने, मांसाहार त्यागला.रोज २० हजारांची गर्दीयेथील दर्डा उद्यान मार्गावर ‘संस्कार यज्ञ’ या ...
‘कडवे वचन’ने केले मनपरिवर्तन
ठळक मुद्देमुनिश्री तरुणसागरजींच्या स्मृती : यवतमाळातील ऐतिहासिक वचन