शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

अवघ्या सहा दिवसांत कोरोना बाधितांचा आकडा शंभरवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2022 05:00 IST

एकूण १०७ रुग्णांपैकी ९६ रुग्ण हे जिल्ह्यातील तर ११ रुग्ण जिल्ह्याबाहेरील असल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले. जिल्ह्यात आजवर ७३,०८९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून, त्यातील ७१ हजार १९४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर १,७८८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी जिल्ह्यात खासगी व शासकीय मिळून १७४४ बेड उपलब्ध आहे. नागरिकांनी कोरोनाचे वाढते संकट लक्षात घेता सतर्कता बाळगण्याची गरज व्यक्त होत आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोनाचे संकट दिवसेंदिवस उग्र होत आहे. शुक्रवारी आणखी ३२ जणांचे अहवाल बाधित आल्याने जिल्ह्यातील एकूण रुग्णांचा आकडा आता १०७ इतका झाला आहे. विशेष म्हणजे यातील १०६ रुग्ण हे अवघ्या सहा दिवसांत वाढले आहेत. कोरोनाची स्थिती पाहता नागरिकांनी प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याची आवश्यकता आहे. मागील सहा दिवसांतील कोरोना रुग्णांची संख्या पाहता येणाऱ्या काही दिवसांत जिल्ह्यात कोरोनाची तिसरी लाट सक्रिय होण्याची भीती आता वर्तविली जात आहे. आठवडाभरातच कोरोनाने जिल्हावासीयांची चिंता वाढविली आहे. २ जानेवारी रोजी जिल्ह्यात सहा बाधित निष्पन्न झाले होते. त्यानंतर ३ जानेवारी रोजी यात चार रुग्णांची भर पडली. ४ जानेवारी रोजी आणखी ११ बाधित आढळले. तर त्याच्या दुसऱ्याच दिवशी ५ जानेवारी रोजी १९ कोरोना रुग्ण निष्पन्न झाले. त्यानंतर गुरुवारी ६ जानेवारी रोजी ३४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तर शुक्रवारी यात आणखी ३२ जणांची भर पडली. एकूण १०७ रुग्णांपैकी ९६ रुग्ण हे जिल्ह्यातील तर ११ रुग्ण जिल्ह्याबाहेरील असल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले. जिल्ह्यात आजवर ७३,०८९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून, त्यातील ७१ हजार १९४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर १,७८८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी जिल्ह्यात खासगी व शासकीय मिळून १७४४ बेड उपलब्ध आहे. नागरिकांनी कोरोनाचे वाढते संकट लक्षात घेता सतर्कता बाळगण्याची गरज व्यक्त होत आहे. 

बाधितांमध्ये यवतमाळ येथील २७ जणांचा समावेश- शुक्रवारी तपासणीसाठी पाठविलेल्या १,०६८ पैकी ३२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात ११ महिला व २१ पुरुषांचा समावेश असून, त्यात पुसद तालुक्यातील चार, तर यवतमाळ येथील २७ जणांचा समावेश असून इतर एक रुग्ण जिल्ह्याबाहेरील असल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले. - दरम्यान, शुक्रवारी दोघा जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. सध्या १०७ रुग्णांवर कोविड केअर सेंटरमध्ये उपचार करण्यात येत आहेत. 

जिल्ह्याचा दैनंदिन पॉझिटिव्हिटी रेट ३ वर - मागील सहा दिवसांत कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दरही ९.२४ इतका झाला असून, दैनंदिन पाॅझिटिव्हिटी दर ३ तर मृत्यू दर २.४५ एवढा आहे. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे, गर्दी जावू नये, तसेच मास्कचा वापर करावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या